Pune School : ‘येत्या सात दिवसांमध्ये पुण्यातील शाळांबाबत निर्णय घेणार’ – अजित पवार

Pune School : ‘येत्या सात दिवसांमध्ये पुण्यातील शाळांबाबत निर्णय घेणार’ – अजित पवार

पुणे – गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा एकदा करोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यासोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, त्यानंतर राज्य सरकारने राज्यभरातील २३ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार काही सोमवारपासून काही भागातील शाळा सुरूही झाल्या. मात्र, पुण्यातील शाळा अद्याप बंदच आहे.

दरम्यान, लवकरच पुण्यातील शाळा सुरूहोणार असून येत्या सात दिवसांमध्ये शाळांबाबतचा निर्णय घेण्यात येईल. असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. आज (दि. २६) अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस मुख्यालयात ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.