Big Accident: दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, दोघे ठार

Big Accident: दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, दोघे ठार

सांगली – तासगाव-सांगली रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात दोघे ठार तर सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना कवठेएकंदनजीक रविवारी दुपारी दीड वाजता घडली.

मांजर्डे (ता. तासगाव) येथील कुटुंब गाडी सांगलीहुन तासगावच्या दिशेने जात होते. तर दानोळी (ता. शिरोळ) येथील कुटुंब गाडी सांगलीच्या दिशेने जात होते. कवठेएकंदजवळ वरद कोल्ड स्टोअरेजनजीक दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांमधील आठजण जखमी झाले. सर्वांना तात्काळ रुग्णवाहिकेतुन सांगलीतील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अद्याप मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.

अपघातामुळे तासगाव-सांगली रस्त्यावरील वाहतुक काहीवेळ ठप्प झाली होती. दोन्ही बाजुस तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थ व युवकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.