AIMIM च्या स्थापना दिनानिमित्त रुग्णवाहिका आणि शववाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवर असलेल्या AIMIM कार्यालयात शहराध्यक्ष चांद मुहम्मद यांच्या पालकांच्या अध्यक्षतेखाली रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे उद्घाटन करून मजलिसच्या 64 व्या स्थापना दिन साजरा करण्यात आला.
हैदराबाद महानगरपालिकेत 24 जागा जिंकून सुरू झालेल्या AIMIM च्या राजकिय प्रवासाचे हे 64 वे वर्ष आहे, आता या पक्षाचे दोन खासदार संसदेत वंचित आणि दुर्बल घटकांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह इतर अनेक राज्यांमध्ये मजलिसे इत्तेहादुल मुसलमीनने विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच मुसंडी मारून आपली उपस्थिती दर्शवली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही पक्षाची स्थिती मजबूत झाली असून, यवतमाळ शहराध्यक्ष चांद महंमद यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी पक्ष कार्यालयासमोर आपल्या आई वडिलांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सय्यद मोहसीन यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना लोकांना मजलिसचा इतिहास आणि तत्त्वांची जाणीव करून दिली.
यावेळी शहराध्यक्ष चाँद महंमद यांनी यवतमाळच्या सर्व जनतेचे सहकार्याबद्दल आभार मानले व मजलिसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगितले जेणेकरुन मजलिस यवतमाळच्या अधिकाधिक तालुक्यांमध्ये आपले नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणतील. पक्षातील सर्व पदाधिकारी आणि जबाबदारांना आपापल्या समित्यांचा विस्तार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एआयएमआयएमने दोन आरोग्य दूत नियुक्त केले आहेत, ते दवाखान्याशी संबंधित कामात मदत करतील. अंत्यसंस्कारासाठी मोफत शववाहिका सेवा पुरविली जात आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
चांद मुहम्मद
AIMIM शहर अध्यक्ष