50 शीकडे झुकलेल्या हॉट मलायकाच्या सुंदर केसांचं रहस्य दडलंय ‘या’ मध्ये; केसगळतीसाठी फक्त अन् फक्त ठेवते याच तेलावर विश्वास!

50 शीकडे झुकलेल्या हॉट मलायकाच्या सुंदर केसांचं रहस्य दडलंय ‘या’ मध्ये; केसगळतीसाठी फक्त अन् फक्त ठेवते याच तेलावर विश्वास!

मुंबई – बॉलिवूडच्या बर्‍याच अभिनेत्री मग शिल्पा शेट्टी, मलाइका अरोरा किंवा सुष्मिता सेन असो, यांनी चाळीशी पार केल्यावरही आपल्या आकर्षक व फिट देहयष्टीमुळे सर्वांना चकित केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

50 वर्षीय मलायका अरोराने तिच्या फिटनेसचे रहस्य योगा हेच असल्याचे सांगितले आहे. तर, आपल्या चमकदार आणि मजबूत केसांसाठी सुद्धा मलायका असंच काहीसं करत आहे. हे सुद्धा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका आपल्या मजबूत आणि सुंदर केसांसाठी एका विशिष्ठ तेलाने चंपी करते. हो… स्वतः हा मालयकाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. ‘ती दर आठवड्याला तीन प्रकारचे ऑईल्स मिक्स करून आपल्या स्कॅल्पवर अर्थात टाळूवर लावते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

यात ती ‘कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल आणि कॅस्टर म्हणजे एरंडेल ऑइल’चा समावेश करते. आणि हे तेल मिक्स करून झाली कि, त्यामध्ये मेथी दाणे आणि कडीपत्ता टाकते. असं मालयकाने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

हे सर्व मिश्रण झाल्यानंतर काही दिवस तेल असेच ठेवून देते जेणेकरून त्यातील सर्व पोषक तत्व एकमेकांमध्ये नीट मिक्स होतील. त्यानंतर तिने हे तेल केसांना कसे लावावे त्याची योग्य पद्धत सुद्धा सर्वांना सांगितली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

हे ऑइल केसांना लावण्याआधी ती हे तेल थोडेसे गरम करते आणि मग स्कॅल्प म्हणजेच टाळूवर गोलाकार पद्धतीने मसाज करते. यामुळे केसांना खूप जास्त फायदा होतो असे मलायकाचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका आपल्या केसांवर हे तेल 45 मिनिटे ते एक तास लावून ठेवते आणि त्यानंतर योग्य पद्धतीने ती आपले केस वॉश करते. त्यामुळेच या वयात सुद्धा मालयकाचे केस अत्यंत सुंदर, चमकदार आणि मजबूत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

तसेच, मलायका आपल्या सुडोल आणि आकर्षक फिगरसाठी रोज योगा करते. यामध्ये ती ‘सर्वांगासन हलासन, वृक्षासन, उष्ट्रासन’ हे योगासन न चुकता रोज करते. त्यामुळेच 50 वर्षीय मलायका आज ही बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींना मागे टाकत आहे.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.