28 लाख रु चे बोगस बीटी बियाणे जप्त

28 लाख रु चे बोगस बीटी बियाणे जप्त

यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील मराठवाकडी गावाजवळ पोलीस विभागाच्या कारवाईत 28 लाख रु चे बनावट कापसाचे बीटी बियाणे जप्त करण्यात आले। प्रकरणी दोन संशयितावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेतले। या कारवाईने कृषी क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली।

रात्रीच्या सुमारास पांढरकवडा पोलिस पेट्रोलिंग करत असतांना मराठवाकडी गावाजवळ एक पिकप व्हॅन उभी होती। पोलिसांना त्या वाहनाचा संशय आल्या मुले त्याची तपासणी केली असता त्यात बियाणे असल्याचे लक्षात आले। त्यामुळे पोलिसांनी या बियाण्याचे कागद पत्र मागितले. व्हॅन चालका जवळ कोंत्येही कागद पत्र दिसून आले नाही त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। पोलिसांनी बियान्याच्या पोटे तपासल्या असता त्यातुन काव्या बीटी वाणाचे ची 1400 आणि पावणी नावाचे 1600 बॅग आढळून आल्या। त्याची किंमत 28 लाख 50 हजार रु च्या जवळपास आहे। हे बियाणे कर्नाटक मधून महाराष्ट्र मध्ये विक्री साठी आले। या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी पर्यावरण आणि फसवणूक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून चालक मंजुनाथ रेड्डी( कर्नाटक) आणि साथीदार व्यंकटेशस्वरा आदिनारायन डुग्गुबाती (आंध्रप्रदेश) दोघांना अटक केली।

Updated : 9 April 2022 12:12 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.