14 एप्रिल रोजी 501 विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र

14 एप्रिल रोजी 501 विद्यार्थ्यांना मिळणार

ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र

14 एप्रिल रोजी 501 विद्यार्थ्यांना मिळणार

ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र

फुलचंद भगत

वाशिम: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन 6 ते 16 एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. या सामाजिक समता कार्यक्रमाचे औचित्य साधून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनी 14 एप्रिल रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमच्या वतीने जिल्हयातील 501 विद्यार्थ्यांना ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इयत्ता 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन प्राप्त करुन घ्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी कळविले आहे.

Updated : 7 April 2022 5:00 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.