12 ते 16 एप्रिल पर्यंत हनुमान आखाडा चौकात श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

12 ते 16 एप्रिल पर्यंत हनुमान आखाडा चौकात श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन
यवतमाळ – शहरातील सर्वात जुने ब्रिटीशकालीन श्री हनुमान मंदीर श्री हनुमान आखाडा चौक यवतमाळ येथे दिनांक 12 ते 16 एप्रिल पर्यंत हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन हनुमान आखाडा चौकात करण्यात आले आहे. दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता किर्तन सोहळ्याचे उद्घाटन बोपापूरवासी प. पु. महंत अंबिका माता यांच्या शुभहस्ते तर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक माधुरी मडावी यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणून दिपमाला भेंडे, पोलीस निरीक्षक महिला पोलीस स्टेशन शैला मिर्झापुरे, सामाजिक कर्यकर्ता सुषमा चंद्रकांत बाविस्कर, सहायक पोलीस निरीक्षक नेहा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून ह. भ. प. सौ. प्रचिती धोंड नागपूर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर दि. 13 व 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता राष्ट्रीय किर्तनकार ह. भ. प. सौ. युगंधरा वीरकर मुंबई यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर दि. 15 एप्रिल रोजी 6.30 वाजता माऊली जगराता मंडळ यवतमाळचे स्वर गायक जितू पाखरे यांचा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच दि. 16 एप्रिल रोजी अंजनीसुत वज्रांगबली श्री हनुमानजीस ब्राम्होक्त अभिषेक सकाळी 9 वाजता संगीतमय सुंदरकांड श्री रामायण मंडळ यवतमाळ, सकाळी 10 वाजता 121 किलो लूडचा महाभोग अर्पण, सकाळी 11 वाजता काला प्रसाद, दुपारी 12 ते 3 पुर्णब्रम्ह (महाप्रसाद) कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान मंदिर हनुमान आखाडा चौक यवतमाळ येथे करण्यात आले आहे. महाप्रसादाचे सौजन्य श्रीमती छाया प्रकाशराव भागवत परतवाडा यांच्या तर्फे करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 7.30 वाजता महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा या कार्यक्रमाचा निमंत्रित भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर श्री हनुमान आखाडा चौक यवतमाळ व भाविक भक्तांनी केले आहे. हा श्री हनुमान जन्मोत्सव यवतमाळकरांच्या सहकार्याने संपन्न होत आहे.