08 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला पोलीस अंमलदार यांचे साठी पोषक आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

(फुलचंद भगत)
वाशिम:-पोलीस दलाचे वतिने पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता राबविण्यात येत असलेल्या नाविण्यपुर्ण ऊपक्रम व कार्यक्रमांमुळे सतत प्रेरणा मिळत असते. वाशिम पोलीस घटकामध्ये एकुण 1350 पोलीस अंमलदार असुन त्यामध्ये 218 महिला पोलीस अंमलदार व 10 महिला पोलीस अधिकारी समावेश आहे.

स्त्री पुरूष समानतेच्या दिशेने वाटचाल करणा-या महाराष्ट्रात स्त्रियांचे कर्तृत्व वंदनिय आहे. महिला हया एक आई,एक बहीण, एक मुलगी, एक पत्नी, एक मैत्रीण, एक आजी म्हणुन समाजात वावरत असतात. तसेच पोलीस दलातील महिला पोलीस हया खडतर कर्तव्य लिलया पेलत आहेत. कुटूंब आणि नोकरी या दोन्ही गोष्टी एका वेळेस संभाळणे म्हणजेच तारेवरची कसरत असते पण महिला पोलीस मात्र ती कसरत हसत हसत पार पाडत आहेत. महिला पोलीसांचा अशा या ऊत्कृष्ट कामगिरीचा वाशिम पोलीस दलाला सार्थ अभिमान आहे.त्याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 05.03.2022 रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) व पोलीस अधीक्षक साहेब यांचे सौभाग्यवती श्रीमती शिरीषा बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली आगामी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांचे आरोग्यविषयक समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम हा परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS), व अपर पोलीस अधीक्षक यांच्या सौभाग्यवती श्रीमती रोशनी भामरे यांचे पुढाकाराने पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रागंणात संपन्न झाला असुन या करीता वाशिम जिल्हा पोलीस दलातील एकुण 137 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होत्या.आगामी जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने आज रोजी महिलांना उमेश डान्स व झुंबा फिटणेस स्टुडीओच्या वतीने महिलाच्या आरोग्याविषयी व आहाराविषयी माहिती देण्यात आली तसेच पोलीस दलात कर्तव्य बजावत असतांना आपले प्रकृतीकडे दुलर्भ होणार नाही व आपली प्रकृती तंदुरूरत राहणेसाठी व्यायाम प्रकाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

तसेच या वेळी ‘झुंबा’ या व्यायामप्रकाराचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. यावेळी वाशिम पोलीस दलात मागील काही दिवसांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणा-या 12 महिला पोलीस अंमलदार यांचा मा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनाचे कार्यकमाकरीता हजर असलेल्या सर्व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा पत्र देवुन जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच यावेळी महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे साठी अल्पोहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम मा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS), पोलीस अधीक्षक साहेब यांचे सौभाग्यवती श्रीमती शिरीषा बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी (iPs), व अपर पोलीस अधीक्षक यांच्या सौभाग्यवती श्रीमती रोशनी भामरे, पोनि श्री सोमनाथ जाधव स्थागुशा,पोउपनि अश्विनी धोंडगे, पोउपनि स्वाती इथापे व इतर महिला पोलीस अंमलदार यांनी पार पाडला.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206