हुडी येथील माजी सरपंच, संतोष धरणे यांचा उपोषणाचा चवथा दिवस

हुडी येथील माजी सरपंच, संतोष धरणे यांचा उपोषणाचा चवथा दिवस

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी

बातमी पुसद हडी……

पुसद येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत हुडी येथे माजी सरपंच संतोष धरणे हे दि. 28 मार्च 2022 पासून उपोषणास बसले आहे,

सविस्तर वृत्त असे की, हुडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा ग्रामस्थ संतोष दिगंबर धरणे यांनी हुडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवक अनिता दिगंबर आगाशे व सरपंच आनुराधा शिवानंद कानेकर यांनी सन 2019 मध्ये दलित वस्ती, तंटामुक्ती गाव समिती, पाणीपुरवठा निधी, स्वच्छ भारत मिशन या योजने चा निधी , 14 लाख 34 हजार 366 रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार व पाठपुरावा हुडी येथील माजी सरपंच संतोष दरणे यांनी संबंधित विभागात अनेक वेळा पत्रव्यवहार करून संबंधित तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांचेवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसून, या प्रकरणी कार्यवाही करावी यासाठी सर्वच कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहे.त्यापैकी महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ,, जिल्हा पोलिस अधिक्षक यवतमाळ,इत्यादी कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

पुसद पंचायत समितीचे, कर्तव्यदक्ष, गटविकास अधिकारी यांनी अनेक वेळा दिलेले पत्र,तसेच पंचायत समिती पुसद यांनी श्री शिवाजी गवई गटविकास अधिकारी यांना फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत दिलेले पत्र अशा प्रकारे कार्यालयीन संबंधित अधिकारी यांच्याशी अनेक वेळा झालेला पत्रव्यवहार करून सुद्धा झालेल्या घोटाळ्या संबंधी संबंधित कर्मचारी तथा सरपंच यांच्यावर कोणतीही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही, शेवटी तक्रार करते यांनी शेवटी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे.

दि. 28 मार्च 2022 पासून उपोषण करते यांनी उपोषणास बसावे लागत असल्याची खंत हूडी गावचे माजी, सरपंच संतोष दरणे यांनी या प्रसंगी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या, यानंतरही प्रशासनाने कारवाई न केल्यास पुढील कार्यास आमरण उपोषण करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

या उपोषण प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले माजी सरपंच संतोष धरणे, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 2 April 2022 4:30 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.