हिवरा येथील नदीत पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी २ युवक पाण्यात बुडून मृत्यू..


हिंगणघाट दि.६
तालुक्यातील हिवरा येथील नदीत पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी २ युवक पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची घटना रविवारी ६ मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आली.
यातील ऋतिक नरेश पोकळे वय २१ वर्ष व संघर्ष चंदूजी लढे वय १६ वर्ष, राहणार पिपरी या दोघांचा नदीत बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला.
तर रणजीत रामाजी धाबर्डे वय २८ वर्ष, शुभम सुधाकर लढे वय २६ वर्ष, या दोघांना उपस्थित नागरिकांनी पाण्याबाहेर काढून प्राण वाचवले.
रविवारी दुपारच्या सुमारास आजनसरा येथून मोटरसायकलने पिपरी येथील ४ युवक हिवरा येथील नदीवर पोहण्यासाठी गेले.
परंतु सर्वांना नदीच्या पाण्याचा अंदाज आल्या नसल्याने चारही युवक नदीत बुडाले.
माहिती मिळताच हिवरा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी २ युवकांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले,घटनेची माहिती मिळतात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बांगडे व सहकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.