हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जन्म जयंती निमित्त नालासोपारा शहरात शिवसेनेचे रक्तदानाचा महायज्ञ .2000 रक्तदात्यांनी केले रक्तदान,

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जन्म जयंती निमित्त नालासोपारा शहरात शिवसेनेचे रक्तदानाचा महायज्ञ .2000 रक्तदात्यांनी केले रक्तदान,

वैभव पाटील : प्रतिनिधि/पालघर


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्त रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना पालघर जिल्हा नालासोपारा शहराच्या वतीने ” नालासोपारा शहरत रक्तदानाचा महायज्ञ शिबीर” आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे यंदाचे ३० वे वर्ष होते. शिवसेना नालासोपारा शहराच्या वतीने शिवसेना पालघरचे माजी जिल्हाप्रमुख श्री. शिरीष जयराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. नालासोपारा शहरात एकाच वेळेस तब्बल २१ वेगळ्यावेगळ्या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा संपूर्ण वर्षभर गरीब व गरजू लोकांच्या रक्त मागणीस पुरवठा करण्याकरता केला जातो. संपूर्ण शहरात २००० रक्तदात्यांनी रक्तदान केले असून आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.

या शिबिरास पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावीत , पालघर जिल्हा संघटक शशिकांतजी मोरे , वसई तालुकाप्रमुख , निलेश तेंडोलकर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पालघर जिल्हा सचिव हेमंत पवार, वसई तालुका संघटक प्रभा सुर्वे, शहरप्रमुख प्रदिप सावंत, संतोष टेंबवलकर, शहरसंघटक रेश्मा सावंत, पवित्रा चंदा, युवा जिल्हा चिटणीस भूमिष सावे, विधानसभा युवा अधिकारी रोहन चव्हाण, वविशमनपा माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख स्वप्नील बांदेकर आणि संयोजक नरेश जाधव, नालासोपारा युवा सचिव नितेश कुवेसकर तसेच समस्त उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी अथक मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Updated : 25 Jan 2022 4:22 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.