हर हर महादेव' च्या जय घोषात श्री क्षेत्र झमकोला येथे महाशिवरात्र भरली मोठया उत्साहात

निलेश भोयर झरी
: ‘हर हर महादेव’ च्या जय घोषात श्री क्षेत्र झमकोला येथे महाशिवरात्र भरली मोठया उत्साहात भरली. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने व शासनाने निर्बंधामध्ये शिथीलता अणण्याने यावर्षी पहाटेपासूनच दर्शनाला गर्दी दिसली.
पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास सकाळी सात वाजल्यापासून भाविकांची रांग लागली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला व दर्शनाला सुरुवात झाली.झमकोला येथेल दुकानदारांनी गर्दी होण्याचा अंदाज असल्याने माल भरला होता.यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. महाशिवरात्र यात्रेनिमित्त झमकोला देवस्थान कमेटी, पोलिस विभाग यांनी चोख तयारी केली होती.
Updated : 2 March 2022 10:34 AM GMT