हरड़प येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा..

शोभा बहुद्देशीय संस्था हरड़प ता.माहुर जि नांदेड अंतर्गत जागतिक महिला दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला प्रभा बहुउदेशीय संस्थेच्या अध्यक्ष पललवी प्रभाकर राठोड,उपाध्यक्ष संचेती राजेश जाधव सचिव शितल राठोड
तर कोषाध्यक्ष शोभा राठोड तसेच संस्थेतील सदस्य यांनी या कार्यक्रम घेऊन हरडप तांड्यातील व गावातील कार्यरत असलेला सर्व महिलाचे सम्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केलं. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी गण म्हणून हरडप येथील माजी सरपंच उत्तम राठोड, महाराष्ट्र ग्रामीण बँक असिस्टर मॅनेजर निकीता खापर्डे उमेद अभियानाच्या बैंक सरवी माधुरी सोनटक्के, सिंदूताई धोटकर , राहणार मदनापुर (सेंद्रिय शेतीच्या प्रणेत्या) सरपंच दिपक किना उमेद अभियान चे अत्राम सर, व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद नरवाडे. उपस्थित होते. व गावातील सर्व महिला वर्ग, शितल लुटे यांची कार्यक्रमाची संचालन केल..
प्रतावना।।।
“ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली,
तो जिजाऊचा शिवबा झाला,
ज्याला स्त्री ‘बहिण म्हणून कळली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला, आणि
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला !’
प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !
आज च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो !
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, असे राजमाता जिजाऊ, “मैं मेरी झांशी नहीं दूंगी” इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाच्या सावित्रीबाई फुले अशा सर्व सन्माननीय स्त्रियांच्या कार्याला वंदन….
स्त्री म्हणजे वात्सल्य,स्त्री म्हणजे मांगल्या
स्त्री म्हणजे मातृत्व,स्त्री म्हणजे कर्तृत्व
सर्वप्रथम एथे जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर ‘जागतिक महिला दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो.८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रो द्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करने व सुरक्षितता इ. मागण्या केल्या व निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतः च्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व ती पासही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक महिला दिन २०२२ या दिवसाचा मुख्य हेतू महिला सबलीकरण करणे हा आहे. हा दिवस महिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा आहे. स्त्रीला अनेक नाती जोपासावी लागतात प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ स्त्रीच असते. स्त्री आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावत म्हणून जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.
आज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर स्त्री आहे. पण तरीही स्त्रियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर वनले पाहिजे आणि निर्भयपणे संकटांचा सामना केला पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे महिलांच्याच हातात आहे.
त्री सन्मानाची सुरवात आपण आपल्या घरापासून करायला हवी तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल.तर येवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत
आभार प्रदर्शन
!”वार नाही तलवार आहे…
ती समशेरीची धार आहे…
स्त्री म्हणजे अबला नाही…
ती तर धगधगता अंगार आहे !!”
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार……
आजच्या या कार्यक्रमात वेळातून वेळ काढून उपस्थित झालेले मान्यवर आणि माझा प्रिय महिला वर्ग आपण सर्वांनी आज येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली…..तसेच मला या मंचा वर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी शीतल राठोड आपल्या सर्वांचे मना पासून आभार मानते……व आपला कार्यक्रम संपला असे जाहीर करते