सेवकराम रायबोले सर यांचा हृदयस्पर्शी सत्कार!

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
बातमी, पुसद………………………
सेवकराम रतिराम रायबोले मूळचे घोडचंदी, तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील रहिवासी असून त्यांचे शैक्षणिक जीवन मराठवाड्यातील नामांकित अश्या मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथून बी एस सी, एम. ए. शिक्षण शास्त्र, व बी. एड. ची पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले व ते नोकरीनिमित्त पुसद येथे वास्तव्यास आले त्यांनी महागाव तालुक्यातील, मोहदी येथील भाऊसाहेब सुधाकरराव नाईक, येथील विद्यालयात १ जुलै 1992 पासून आपला 30 वर्षांचा प्रदीर्घ कार्यकाळ यशस्वी पूर्ण केला ते अत्यंत मितभाषी व शांत स्वभावाचे, असून आंबेडकरी चळवळीचे नाळ जुळलेले धम्म बांधव आहेत ते सध्या, वसंत पार्क पुसद येथे वास्तव्यास आहेत.
आपले सहकारी मित्र तीस वर्षाचा सेवा कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्याच्या आनंद द्विगुणित झाल्याच्या अनुषंगाने आपल्याच धम्म बांधवांने दिनांक 28 फेब्रुवारी २०२२ रोजी आयु. उपासक एस.आर. रायबोले सर यांची कारकिर्द यशस्वी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ! केले व पुढील आरोग्य , दिर्घायुष्य लाभो त्यांचे संकल्प सम्यक मार्गाने पूर्ण होवोत अशा हार्दिक शुभेच्छां सह त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला याप्रसंगी गणेश वाठोरे परिवार आणि दादाराव अगमे परिवार पुसद यांचा मुख्य सहभाग होता.
तसेच प्रज्ञापर्व 2022 जयंती उत्सव समितीच्या कार्यासाठी त्यांनी हिरिरीने भाग घेऊन आपला सहभाग दर्शवला होता तसेच प्रज्ञापर्व समिती, कार्यकारणी 2022 व समस्त उपस्थित बांधवाच्या वतीने त्यांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.