सुसंस्कार विद्या मंदिर येथे विज्ञान दिन उत्साहात

सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी,तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट व्हाव्यात या दृष्टीने ह्या, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅडम उपस्थित होत्या.
वैवीध्यपूर्ण रितीने उद्घाटन करून विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात झाली. ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
तसेच १ली ते ५ वी पर्यंतच्या मुलीचा समावेश होता,तसेच वर्ग ते ९ च्या विद्याध्यांनी मोठ्या हिरीरीने व उत्साहाने भाग घेऊन विज्ञानाशी निगडीत विविध प्रतिकृती तयार केल्या त्या विषयी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक माहिती सांगितली. यात विद्यार्थ्यांनी अम्लीय प्रतिक्रिया, आम्लव आम्लारी क्षार,फुप्फुसांचा संसर्ग, पावसाच्या पाण्याची साठवण विधुत चुंबक, जळण्यासाठी ऑक्सीजन ची गरज आहे,आपल्या जिवनात विज्ञानाचे महत्व,वैज्ञानिकाची जिवन गाथा, विज्ञानातील वेगवेगळ्या कृती प्रत्यक्ष दाखविल्या व वेगवेगळ्या कृती प्रत्यक्ष समजावून सांगितल्या.
वीज विद्युत निर्मित तयार करण्याची (प्रकल्प) प्रतिकृती तयार केली, त्यांची माहिती समजावून सांगितली.
कार्यक्रमकरिता तीन ग्रुप तयार करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन कु. मेघा गतफणे, कु. अन्वेशा चांदेकर,शर्वरी मारावार यांनी केले,
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य सौ उषा मॅम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाना माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यातआले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.