सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर‼️

सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर‼️

M marathi ❗शैक्षणिक अपडेट

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल) परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी दि. ११ ते १६ जून आणि दि. १७ ते २३ जून या दोन टप्प्यांत होणार असल्याचे सीईटी-सेलने जाहीर केले

आहे.

बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या काही अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र, विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १५ एप्रिलपर्यंत, तर विलंब शुल्कासह १६ ते २३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. एमबीए, एमसीए सीईटीसाठी येत्या २० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर पदव्युत्तर पदवी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १० एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल.

परीक्षेचे नाव :

संभाव्य परीक्षेच्या तारखा –

एमएचटी-सीईटी :

📃 *पीसीएम ग्रुप :* ११ ते १६ जून,

📃 *पीसीबी ग्रुप* १७ ते २३ जून

📃 *एमबीए/ एमएमएस :* २४, २५ आणि २६ जून

📃 *एमसीए-सीईटी :* २७ जून

📃 *बी. एचएमसीटी-सीईटी :* २८ जून

📃 *एम. एचएमसीटी :* २८ जून

📃 *एम. आर्च :* २८ जून

📃 *दृश्यकला पदवी व डिझाईन :* १२ जून

📃 *एलएलबी ३ वर्षे :* ४ ते ६ जून

📃 *एलएलबी ५ वर्षे :* १० जून

📃 *बी. पीएड. :* ३ जून

📃 *बी. एड्./एम. एड्. :* ९ जून इंटिग्रेटेड कोर्स

Updated : 9 April 2022 9:32 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.