सिव्हिल लाईन येथे मनसे वाहतुक सेनेची शाखा स्थापन

सिव्हिल लाईन येथे मनसे वाहतुक सेनेची शाखा स्थापन

सिव्हिल लाईन येथे मनसे वाहतुक सेनेची शाखा स्थापन

फुलचंद भगत

वाशिम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे हात बळकट करण्याकरीता स्थानिक सिव्हील लाईन येथे ३१ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या हस्ते मनसे वाहतुक सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

हा कार्यक्रम मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, वाहतुक सेना अध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनात वाहतुक सेना उपाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या परिश्रमातून पार पडला. यावेळी मनिष डांगे यांनी फित कापुन शाखा नामफलकाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला मनसे जिल्हा उपाध्यक्ष केशव गरकळ, मालेगाव तालुकाध्यक्ष गवई, वाशीम तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, रिसोड शहर उपाध्यक्ष अमोल तुरेराव, महिला सेनेच्या सिता धंदरे यांची उपस्थिती होती. यावेळी शाखा अध्यक्ष महादेव जोगदंड, शाखा उपाध्यक्ष तानाजी ढोणे, शाखा सचिव दिनेश हरणे, सदस्य अशोक पंडीत, प्रकाश मडी, सुनिल ढोणे, राजकुमार कांबळे, संतोष पारसकर, विनोद आठवले आदींचा मनसेत पक्षप्रवेश करण्यात आला. कार्यक्रमाला गणेश इंगोले, प्रकाश कवडे, गजानन कुटे, विठ्ठल राठोड, मयनोद्दीन काझी आदींची उपस्थिती होती.

Updated : 7 April 2022 5:56 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.