सावरकर नगरातील नागरिकांना हटवू नका आ.मुनगंटीवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र महानगर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


रेल्वेयार्ड पासून काही अंतरावर असणाऱ्या सावरकर नगरातील दूध डेअरी परिसरातील नागरिकांना हटवू नका या आशयाचे पत्र विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाठविल्याने सावरकरनगरातील नागरिकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.या संदर्भात महानगर भाजपाच्या एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्याना शुक्रवार,8 एप्रिलला निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,उपमहापौर राहुल पावडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,सचिव रामकुमार अकापेलिवार,प्रमोद क्षिरसागर,राकेश बोमनवार,अंकीत निरंजने,प्रवीण उरकुडे,महेश झिटे,बबन राऊत यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी यांचे वतीने अप्पर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांनी निवेदन स्वीकारले.या वेळी चर्चा करताना डॉ.गुलवाडे म्हणाले,वीर सावरकर नगरातील दूध डेअरी परिसरात पक्के बांधकाम करून राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे प्रशासनासने काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावला.रेल्वे प्रशासना नुसार हे बांधकाम अवैध असून रेल्वेच्या जागेवर आहे.या नोटीसमूळे धास्तावलेल्या नागरिकांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत आपबीती सांगितली.या नागरिकांची घरे रेल्वे यार्ड पासून बरेच लांब आहे.किमान 20 वर्षा पासून यांना सर्व मूलभूत सुविधा मनपा तर्फे मिळत असल्याने ते कर देखील भरत असल्याचे रेल्वे मंत्र्याच्या निदर्शनास,आ.मुनगंटीवार यांनी आणून दिले आहे.या नागरिकांचे बांधकाम हटविल्यास त्यांचे समोर वास्तव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.
म्हणून या नागरीकांना दिलासा द्यावा.अशी मागणी लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे कडे लावून धरली असतांना जिल्हा प्रशासनासने देखील पुढाकार घ्यावा.जनतेला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.ही समस्या घेऊन सावरकर नगरातील गणेश चालविलकर,विजय यादव,वंदना चिंचोळकर,सुनील नागोसे,देवराव दहिकर,शंकर कांबळे,राकेश कश्यप,मयुरी गांगरेड्डीवार,खुशबू किताबुद्दीन यांनी आ.मुनगंटीवार भेट घेतली,याकडे उपमहापौर राहुल पावडे यांनी लक्ष वेधले.