सायफळ ग्रामपंचायत हद्दीत कोळी शिवारात सुरू असलेल्या गिट्टी क्रेशर नियमबाह्य सुरच..

जिल्हाधिकारी नांदेड यांनी लावलेल्या नियमांची पायमल्ली..
माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ ग्रामपंचायत कोळी शिवारात मागील दोन ते अडीच वर्षापूर्वी गिट्टी क्रेशर उभारण्यात आले आहे. त्या गिट्टी क्रेशर ला जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिनांक 30/ 12/ 2021.ते दिनांक 15 /3/ 2022.या कालावधीपर्यंत परवाना राहील व त्या परवाना देण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियम व अटी व शर्ती लावुन परवाना दिलेला आहे त्या परवान्यात दिलेल्या नियमानुसार हा क्रेशर फक्त दिवसाच्या वेळीच सुरू राहील असे नियम लावले आहे.फक्त 500 ब्रास उत्खलन करू शकते, व कोणत्याही वेळीखाणकामाची खड्ड्याची पृष्ठभागापासून ची खोली सहा मीटर च्या अधिक असणार नाही,कोणतेही खनिज सांडू नये किंवा त्याची धूर उडू नये यासाठी ट्रक किंवा ट्रॅक्टर ताडपत्री ने किंवा योग्य अशी इतर साधनाने झाकून खनिज मालाची वाहतूक केली जाईल,परवान्याची मुदत संपल्यानंतर परवाना क्षेत्रात पडून असून राहिलेल्या गौण खनिज मालावर व इतर मालमत्तेवर परवानाधारकांची कोणताही हक्क असणार नाही, या सर्व नियमांची पायमल्ली करून दिवस-रात्र गिट्टी क्रेशर सुरू करून मोठ्या प्रमाणात उत्खलन करत आहे.. या गंभीर समस्येकडे संबंधित महसूल अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. या समस्येवर संबंधित उपविभागीय अधिकारी किनवट यांनी लक्ष देईल का? व कोणती कारवाई करणार याच्यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे..
सदर परवान्याची दिलेली तारीख संपली असून संबंधित अधिकारी या परवान्याची चौकशी करावी.