समतापर्व ठरणार वैचारिक प्रबोधनाची पर्वणी 7 ते 14 एप्रिल 2022 पर्यंत चालणार समता पर्व

समतापर्व ठरणार वैचारिक प्रबोधनाची पर्वणी

7 ते 14 एप्रिल 2022 पर्यंत चालणार समता पर्व

समतापर्व ठरणार वैचारिक प्रबोधनाची पर्वणी

7 ते 14 एप्रिल 2022 पर्यंत चालणार समता पर्व
समता पर्वामध्ये भारतातील पहिली महिला आदिवासी कुलगुरू सोना झरिया मिंज, प्रसिद्ध वक्ते आंबेडकरी विचारवंत डॉ. कन्हैयाकुमार , प्रसिद्ध जर्नालिस्ट अशितोष कुमार, उद्योग आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समतापर्व होईल.

यवतमाळ प्रतिनिधी

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समतापर्व 2022 चें आयोजन करण्यात आले असून सर्व समाज बांधवांना करिता ही वैचारिक प्रबोधनाची पर्वणीच ठरणार आहे . वैचारिक मंथनासोबतच यवतमाळ आयडॉल , करीयर्स गायडन्स, युवकांसाठी स्वंयरोजगार मार्गदर्शन , सामान्य ज्ञान स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , रंगभरण स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , समता ऑलंपियाड स्पर्धा व महिलांच्या विविध स्पर्धेचे वैचारिक तथा मनोरंजनात्मक कार्यक्रम हे वैशिष्ट्यपूर्ण समाजबांधवांच्या कलागुणांना वाव देणारे ठरणार आहे. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनी, पथनाट्य ,एकपात्री प्रयोग, तथा फुले-शाहू-आंबेडकरी गीतांची स्वरांजली, समता विचारवेध सत्रे, एक क्षण गौरवाचा, विविध वैचारिक पर्व होणार आहे. सोबतच 8 एप्रिल 22 ला सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे व इंडियन आयडॉल आशिष कुलकर्णी यांचा हिट्स ऑफ म्युझिकल शो संयोजक समता पर्व बचत गटाच्या वतीने कार्यक्रम होणार आहे. दि. 7 एप्रिल 22 ला समता पर्व प्रतिष्ठानतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समता पूर्व 22 चा आरंभ होईल.

याच दिवशी सायंकाळी गजल मुशायऱ्याच्या उद्घाटकिय सत्रासह 7 ते 10 पर्यंत गझल गायक रुद्रकुमारांची सुमधुर गझल मैफिल शाम -ए- गझल रंगणार आहे.गझल मैफिलीचे निवेदन ख्यातनाम गझलकार किरणकुमार मडावी करणार आहेत. दि. 8 एप्रिल 22 ला ” हिट्स ऑफ म्युझिकल शो ” चा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे . या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे हे करणार असून प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ , डॉ . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी माधुरी मडावी , ॲड. रामदास राऊत , इंजि.दिपक नगराळे , इंजि . मनोहर शहारे , प्रा.सत्यवान देठे इत्यादीची उपस्थिती राहणार आहे . दि. 9 एप्रिल 22 ला सकाळी 11 वा. रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्याच दिवशी समतापर्वाचे उदघाटकीय सत्र असुन समतापर्व 2022 चेउदघाट्न भारतातील पहिली आदिमवासी महिला कुलगुरू डॉ . सोनाझरिया मिंज यांचे हस्ते होणार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी डॉ . हर्षदीप कांबळे , विकास आयुक्त उद्योग, प्रसिध्द पत्रकार आशुतोष , नवी दिल्ली यांचे जाहिर व्याख्यान ‘ माध्यमांची जबाबदारी आणि भारताचं भविष्य ‘ या विषयांवर होणार आहे . या कार्यक्रमाला ॲड. फिरदोश मिर्झा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे व उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे . त्याच सत्रात यवतमाळ आयडॉल चे उदघाट्न होणार आहे . दि. 10 एप्रिल 22 ला सकाळी 11 वा. सामान्य ज्ञान स्पर्धेचे व काव्य स्पर्धेचे आयोजन व विश्वरत्न कला महोत्सव ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन आहे . भारतातील सुप्रसिध्द वक्ते डॉ .कन्हैया कुमार , नवी दिल्ली यांचे जाहिर व्याख्यान भारतीय लोकशाही व भारताचे भविष्य या विषयावर होणार आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रमोदिनी रामटेके तथा प्रमुख अतिथी म्हणून डॉ . प्रविण इंगोले दिल्ली हे राहतील . दिनांक 11 एप्रिल 22 ला सकाळी महात्मा फुले कृतज्ञता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . स. 11 वाजता वादविवाद स्पर्धेचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यवतमाळ आयडॉल ची दुसरी फेरी होणार आहे .औरंगाबाद येथील आंबेडकरी विचारवंत डॉ . प्रल्हाद लुलेकर यांचे ‘ बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा फुले ‘ या विषयांवर तर डॉ . प्रभाकर गायकवाड यांचे नव्या शैक्षणिक धोरणावर जाहीर व्याख्यान होणार आहे . दि.12 एप्रिल 22 ला एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कॉ . संजय भालेराव यांचे संयोजक आहेत . सदर स्पर्धा सेलीब्रेशन हॉल , मेडीकल चौक , यवतमाळ येथे होणार आहे . तसेच प्रसिध्द इतिहासतज्ञ डॉ . सरफरोज अहमद , सोलापूर यांचे सत्यवादी इतिहास या विषयांवर व संध्या सराडकर अमरावती यांचे महिला विषयावर जाहिर व्याख्यान होणार आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ . लिला भेले असून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा जाहिर सत्कार होणार आहे . 13 एप्रिल 22 ला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी यवतमाळ आयडॉल ची अंतिम फेरी व विविध स्पर्धा , तसेच भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा संपन्न होणार आहे . याच बरोबर समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री मा.ना. . विजय वडेट्टीवार , ना . नितीन राऊत , माजी मंत्री शिवाजीराव मोघे , माणिकराव ठाकरे , माजी मंत्री.आ.संजय राठोड , माजी मंत्री,आ .मदन येरावार , माजी मंत्री प्रा. वसंत पुरके , खा.सुरेश धानोरकर , खा .भावना गवळी मा. आ.अशोक उईके तसेच जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार , नगराध्यक्षा कांचन चौधरी व समतापर्व – 2022 ची कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे . या वेळी पत्र परिषदेला ॲड. रामदास राऊत , अध्यक्ष समतापर्व 2022 , प्रा. अंकुश वाकडे , इंजि. मनोहर शहारे , प्रमोदिनी रामटेके , राजूदासजी जाधव , मदन फाळेगावकर , ॲड. इम्रान देशमुख , के . एस . नाईक , पल्लवी रामटेके , प्रा . विजय डोंगरे , प्रा . सत्यवान देठे , जितेंद्र ढाणके , इंजि . दिपक नगराळे , नारायण थूल . जे.डी. मनवर , इंजी. आनंद देवगडे ,सुरज खोब्रागडे , ॲड. राहुल पाटील , मुख्य समन्वयक अनिल रामजी आडे , डॉ.ज्ञानेश्वर गोरे , विलास काळे , एम . के . कोडापे , प्रा . माधव सरकुंडे , जियाभाई , मिनाक्षी वेट्टी , डॉ.दिलीप महाले , किशोर भगत , डॉ . बाळकृष्ण सरकटे , डॉ .चंद्रकांत सरदार , घनश्याम नगराळे,राहुल कोचे , भोजराज भगत , चंद्रकांत वाळके , पवन धोटे , डॉ . मिलींद कांबळे , कमल खंडारे , प्रविण देशमुख , कवडू नगराळे इत्यादीची उपस्थिती होती . असे प्रसिध्दी प्रमुख विजय मालखेडे यांनी कळविले आहे .

Updated : 4 April 2022 4:06 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.