सत्ताधारी काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्री चे आदेश पायदळी

यवतमाळ/वणी : सध्या महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढत आहे। या आळा बसावा म्हणून राज्य सरकारने सभा, मोर्चे यावर निर्बंध लादले। मात्र यवतमाळ जिल्ह्यातील वणी चे माजी आमदार वामनराव कासावर यांना स्वतः चा वाढदिवस साजरा करण्याचा मोह आवरला नाही। यावेळी वाढदिवस साजरा करण्यासाठी महिला सह असंख्य कार्यकर्ते एकत्र जमविण्यात आले। विशेष म्हणजे महाराष्ट्र तील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांनी सुद्धा उपस्थिती लावली। एवढेच नव्हे तर यावेळी वणी शहरातील डॉक्टर महेंद्र लोढा या महोदयांचा चा पक्ष प्रवेश सुद्धा घेण्यात आला। हे डॉक्टर सुद्धा आपला माहोल दाखविण्यात मागे राहिले नाही। भरीत भर त्यांनी सुद्धा ग्रामीण भागातील आपले पिलांटू पक्ष प्रवेशाला उपस्थित राहावे म्हणून एक प्रकारे फार्मनच काढले। आज च्या पक्ष प्रवेश आणि नेत्याच्या वाढदिवस ला शेकडो कार्यकार्ये उपस्थितीत होते। यावेळी घरातील लहान मुलांप्रमाणे वाढदिवस चे गाणे वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। त्यात ही बरेच जण मास्क घालून नव्हेत आणि सामाजिक अंतराचे कोणीच पालन करताना दिसले नाही।
एकीकडे राज्य सरकार कोरोनाचे नियम पाळण्यासाठी आग्रह धरत आहे। नियम न पाळणाऱ्यां कारवाई ला सामोरे जावे लागत आहे। मग आता सत्तेतील नेत्यांनी कोरोनाच्या नियमांची ऐसी तैसी केली तर त्यांच्यावर आता प्रशासन कारवाई करण्याचे चे धाडस दाखवणार का?
एक प्रकारे मुख्यमंत्री मंत्री म्हणजे “किस गलीकी खसखस” असाच दाखविण्याचा प्रयत्न झाला।