संविधानाचा जागर करणार्‍या मुकेश कुरील यांचे मंगरूळपीरमध्ये स्वागत

संविधानाचा जागर करणार्‍या मुकेश कुरील यांचे मंगरूळपीरमध्ये स्वागत

(फुलचंद भगत)

मंगरुळपीर:-पुर्ण महाराष्टातील जवळपास ३२ जिल्हे सायकलवर भ्रंमती करुन भारतीय संविधानाचा जागर करणार्‍या जवगावच्या मुकेश राजेश कुरील यांचे मंगरुळपीरवरुन सायकलवरुन भ्रमंती करीत असतांना येथील युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संविधानाचा जागर पुर्ण महाराष्टात फिरुन करणारे मुकेश राजेश कुरील हे जळगाव खान्देश येथील रहिवासी नुकतेच त्यांचे एलएलबी चे शिक्षण झाले आहे .संविधानाचा अभ्यास करतांना संविधान साक्षर अभियान हा विषय त्यांच्या मनात आला आणि संबंध महाराष्ट्रभर संविधान साक्षरता अभियान अंतर्गत सायकल द्वारे संविधान वाचण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून देशाच्या 75 स्वतंत्र वर्षी संविधान साक्षरता अभियान या उद्देशाने प्रवास करीत आहे. ही सायकलभ्रंमती दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सुरू केला व एकूण प्रवास सुरू केला.हा प्रवास 32 जिल्ह्यातून जाणारy असून, 4000 किलोमीटरचा प्रवास आहे.या प्रवासादरम्यान नागरिकांना भेटणे, त्यांना संविधान साक्षरता अभियान बद्दल माहिती देणे,जिल्हाधिकारी यांना अभियान बद्दल माहिती देणे व निवेदन देणे, नागरिकांना सोबत चर्चा करत सोबत संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी चर्चा करणे,नागरिकांचे संविधान जागर अभियान सांगत त्यांचे विचार जाणून घेणे आपले विचार त्यांना सांगणे हा आहे. मागील वर्षी 5 नोव्हेंबर ते 26 असा जळगाव ते दिल्ली असा एकूण 1800 किमी प्रवास सायकल द्वारे मुकेश कुरील यांनी केला होता. या एकूण प्रवासाला 18 दिवस लागले होते आणि ह्या प्रवासात नंतर महामहीम राष्ट्रपती यांना संविधान साक्षरता बाबत एक निवेदनही सादर केले आहे. त्यात महामहीम राष्ट्रपती यांना विनंती केली आहे की भारतातल्या प्रत्येक शाळा महाविद्यालयांनी शासकीय कार्यालयामध्ये संविधानाची प्रत ही प्रथम दर्शनी ठेवावी. जेणेकरून त्या कार्यालयात या शाळेत या महाविद्यालयांना व्यक्ती संविधान ची प्रत पाहू शकतील,त्याला हाताळू शकतील आणि संविधानाच्या प्रति आकर्षित होऊन, संविधान वाचून घेणे आणि संविधान समजून घेणे आणि संविधानाप्रमाणे आचरण करणे याची एक प्रेरणा सर्वांना मिळेल हा एक प्रयत्न यामाध्यमातुन होणार आहे असे कुरील यांनी सांगीतले.दि. 4 मार्च ला नागपूर येथे सायकलचा प्रवास करत आहेत.मुकेश कुरील यांनी दीक्षाभूमी येथे वंदन केले व सायंकाळी पाच वाजता मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले होतो. तिथे मा. जिल्हाधिकारी नागपूर यांना सायकल अभियान बद्दल निवेदन सादर केलं. त्यांनी अभियानचे स्वागत आणि कौतुक केले आणि या अभियानाला शुभेच्छा दिल्या.नागपूर येथील अनेक मान्यवर, अभ्यासक व्यक्ती ची भेट घेतली. त्यांचं मार्गदर्शन घेतले.

6 मार्च ला मी यावतमाळ येथे सायं 6 वाजता पोहोचलो.. संविधान चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे वंदन केले. श्री अनिरुद्ध खोब्रागडे यांची भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेतले.दि.7 मार्च रोजी सकाळी यवतमाळ येथून निघाले.दि.8 मार्च रोजी मंगरुळपीर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचले त्यावेळी पञकार तथा सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी स्वागत करत संविधान जागर अभियानास शुभेच्छा दिल्या.माझा प्रवास हा जळगाव येथून सुरू होऊन बुलढाणा, अकोला, अमरावती ,नागपूर ,वर्धा, यवतमाळ कारंजा वाशिम ,परभणी ,नांदेड, लातूर ,सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना ,औरंगाबाद, पुणे, नगर ,सातारा, सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रत्नागिरी चिपळूण ,महाड, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे ,जळगाव असा राहणार आहे असे संविधान अभ्यासक मुकेश कुरील यांनी सांगीतले.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 8 March 2022 8:39 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.