संभाजी ब्रिगेड चा आक्रमक पवित्रा समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांच्या समस्या सोडेपर्यंत स्वस्त बसणार नाही – सुरज खोब्रागडे जिल्हाध्यक्ष

संभाजी ब्रिगेड चा आक्रमक पवित्रा समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांच्या समस्या सोडेपर्यंत स्वस्त बसणार नाही – सुरज खोब्रागडे जिल्हाध्यक्ष

यवतमाळ,,,समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या शासकीय वस्तीगृह तसेच शासकीय समाज कल्याण च्या रहिवाशी आश्रम शाळा यावर गेल्या बऱ्याच वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती ही कंपनी द्वारे घेतली जाते यातील ब्रिक्स कंपनी ही चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगार पुरवण्याचा करार झाला आहे तसेच क्रिस्टल कंपनीला येथील सुरक्षारक्षक पुरवण्याचा करार सरकारसोबत झाला आहे पण गेल्या बऱ्याच महिन्यापासून या दोन्ही कंपनीने येथील सामान्य कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारचे वेतन न देता राबवून घेत आहेत त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी वेतन याविषयी विचारणा केली असता ते फक्त उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांना चूप करतात गेल्या दहा महिन्यापासून क्रिस्टल कंपनीने येथील सुरक्षारक्षक आचे पेमेंट थांबवले आहे आणि ब्रिक्स कंपनी ने गेल्या पाच महिन्यापासून त्यांचे पेमेंट दिले नाही यांचे म्हणणे एकच की समाज कल्याण आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे पेमेंट केले नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ शकत नाही आणि जर तुम्ही कामावर नाही आला तर आम्ही तुम्हाला काढून टाकू अशा धमक्या सुद्धा या कंपनीकडून मिळाले आहे अशा सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना भारती आहे कामावरून काढण्याची आणि काळजी आहे आपल्या परिवाराला दोन घास कसे खाऊ घालू त्याची गेल्या दहा महिन्यापासून पेमेंट नसल्यावर आम्ही घर कसे चालवायचे हे दुःख संभाजी ब्रिगेडच्या कानावर ही बाब जाताच सर्व सर्वसामान्य सफाई कामगार आणि सुरक्षारक्षकाचा साठी झटणा-या चा निर्णय संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ खोब्रागडे यांनी केला आहे त्यांना न्याय मिळत पर्यंत कंपनीच्या कोणत्या अधिकाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही अशी ग्वाही सुरज भाऊ नि दिली व कामगार ऑफिस मध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार करून त्यांना धारेवर धरले ब्रिक्स कंपनी ने काही महिन्याचे पेमेंट लगेच करून टाकले आणि क्रिस्टल कंपनीनेही दोन महिन्याचे पेमेंट केले आणि उरलेल्या बाकी महिन्याचे पेमेंट लवकरात करतो असे सांगितले पण या कंपनीवर आमचा विश्वास नाही असे संभाजी ब्रिगेडने ठणकावून सांगत अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर केले या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या टाकण्यात आल्या आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही आक्रमक आंदोलने करू.

Updated : 27 Feb 2022 12:39 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.