संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अविवाहित युवतीचा गर्भपात

संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अविवाहित युवतीचा गर्भपात

यवतमाळ शहरातील नामांकित संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी कळंब तालुक्यातील कानोली (बोरी) येथील राणी नामक युवती गरोदर असल्याने डिलिव्हरी करिता दाखल झाली.

युवतीचे गावातीलच विवाहित श्रीकांत महापुरे यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याने या संबंधातूनच या युवतीला सात महिन्याची गर्भधारणा राहिली.

हे पाप कसे लपवावे या भीतीपोटी यवतमाळ येथील नामांकित संजीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये गर्भपात करण्यात आला.सात महिन्याच्या गर्भाचे नियमानुसार गर्भपात करता येत नसुन तरी देखील त्या युवतीचा गर्भपात यवतमाळ येथील संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर व दवाखान्यातील डायरेक्टर यांच्यासोबत संगणमत करून या गर्भपातासाठी संजीवनी हॉस्पिटलने फार मोठी रक्कम घेतली असून महिलेचे खोटे नाव देऊन गैरकायदेशीर गर्भपात केल्याचा आरोप सौ.सुरेखा श्रीकांत महापुरे यांनी केला आहे.विशेष म्हणजे युवतीला दाखल करतेवेळी राणी भोसले या खोट्या नावाने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने त्या युवतीकडून आधार कार्ड घेतल्याचे सांगितले असूल मुलीचे उपचारासाठी लिहिलेले नाव व आधार कार्डावरील नाव यात साम्य आढळत नसल्याचे समजते.ही डिलेव्हरी करतेवेळी संजीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाने सदर युवतीच्या आई वडिलांचे संमतीपत्र घेतलेली नसून श्रीकांत महापुरे यांच्या सांगण्यावरून त्या युवतीची डिलिव्हरी करण्यात आली असा आरोप श्रीकांत महापुरे यांची पत्नी सौ.सुरेखा श्रीकांत महापुरे यांनी केला.विशेष म्हणजे गर्भपात केल्याप्रकरणी श्रीकांत महापुरे यांची पत्नी सुरेखा श्रीकांत महापुरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना तक्रार दिली असून या तक्रारी मध्ये त्यांनी त्यांच्या पतीचे अविवाहित युवती सोबत अनैतिक संबंध असल्याने त्या युवतीला गर्भधारणा राहिली तसेच त्या युवतीने स्वतःचे नाव बदलून महिलेच्या पतीच्या नावाचा वापर केल्याचा आरोप यावेळी महिलेने केला असून गैर कायदेशीररीत्या गर्भपात करून यामध्ये डॉक्टर व दवाखान्याची डायरेक्टर सामील असून संजीवन हॉस्पिटल येथे अवैध गर्भपाताचे फार मोठे रॅकेट सक्रिय असुन संजीवन मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलची डिलिव्हरी करण्याची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. यामध्ये त्या युवतीचे आधीचे रिपोर्ट तसेच तिच्या आई वडिलांची संमती घेतली नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सुरेखा श्रीकांत महापूरे यांनी केली आहे.

हा गर्भपात नसुन सात महिन्याचे गर्भ पोटातच मृत पावल्याने डिलेव्हरी केली

डाॅ.शितल अग्रवाल

हा गर्भपात नसून तिला कळा सुरू असताना डिलेवरीसाठी दाखल केले व तिच्या सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये सात महिन्याचा गर्भ असून तो गर्भ पोटातच मृत झाले होता.ती महिला तिच्या पती सोबत आली होती तसेच तिने आमच्याकडे सोनोग्राफी रिपोर्ट दाखविला.त्यामध्ये सोनोग्राफी रिपोर्ट मधून बाळ गर्भातच मृत पावले असे दिसत असल्याने आम्ही त्या महिलाची डिलिव्हरी केली डिलिव्हरी साठी आलेल्या महिलांचे आम्ही वय पाहूनच डिलिव्हरी करतो ते कोणाचे बाळ आहे हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.तसेच तिचे आधारकार्ड सुद्धा आमच्या हॉस्पिटल मध्ये असल्याची माहिती डॉ.शीतल अग्रवाल यांनी प्रतिनिधीला दिली.

Updated : 2 March 2022 11:28 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.