श्री महाशिवपुराण कथा नवरात्री कुंभदर्शन यात्रेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

यवतमाळ – भारतीय स्वर्णसंघ यवतमाळ व सार्वजनीक दुर्गादेवी उत्सव मंडळ यवतमाळच्या वतीने दुर्गामाता मंदिर आठवडी बाजार येथे दि. 02 एप्रिल ते 09 एप्रिल पर्यंत श्री. महाशिवपुराण कथा व नवरात्री कुंभदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महाशिवपुराण कथा पठणासाठी काशीनिवाशी परमपुज्य कृष्णकुमार पांडे महाराज विराजीत असून नियमितपणे दुपारी 2 ते 5 श्री महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिदिन मनोहरी झॉंक्यांचे दिव्यदर्शन तसेच शिवकथा महासत्संग रुद्राअभिषेक महिमा, द्वादश ज्योतीर्लिंग कथा, एकादशी रुद्र महिमा, शिव पावर्ती विवाह, गणेश जन्मोत्सव, बेलपत्र महिमा आदिंचे आयोजन करण्यात आले असून महिला भक्तांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी किर्ती तिवारी, दुर्गा मिश्रा, प्रिया जयस्वाल, मोनल यादव, संध्या जयस्वाल, राखी जयस्वाल, कल्पना यादव, बबीता यादव, स्वाती मिश्रा, अंबालीका पांडे, दुर्गा तिवारीसह भारतीय स्वर्णसंघ यवतमाळ महिला मंडळ व सार्वजनीक दुर्गादेवी उत्सव मंडळाचे असंख्य कार्यकर्ते प्रयत्नशिल आहे. नियमित होणार्या सत्संगादरम्यान भारतीय स्वर्णसंघ महिला संघाच्या सदस्य महिला पारंपरागत वेशभुषा धारण करुन नियमितपणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. श्री महाशिवपुराण कथाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
