श्रमसाफल्य बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

श्रमसाफल्य बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
यवतमाळ जिल्ह्यातील युवती व महिलांसाठी केक बेकिंग,आईस्किम बणविणे,रांगोळीचे विवीध प्रकारच्या डिझाईन काढणे, सौंदर्यशास्त्र,ड्रेस डिजायनिंग प्रशिक्षण व मार्गदर्शन सोबतच बँक कर्जासंबंधी मार्गदर्शन सर्वांचे संपूर्ण मार्गदर्शन व युवती व महिलांना उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने श्रम साफल्य बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था,यवतमाळ र.नं YTL/0000045/2022. सुरेश नगर धामणगाव रोड, यवतमाळ येथे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून मनिषा काटे तर प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता वैद्य चारुशीला जगताप,डॉ. चंद्रशेखर देशपांडे,उषा पाटील यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी श्रमसाफल्य बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा दुर्गा बाभुळकर,सचिव संध्या उरकुडे,सभासद जयश्री देशपांडे,सुकांत वंजारी,भक्ती शेणमारे आदी उपस्थित होते.