शेख वासीक यांची सायकलने हजयात्रेचा प्रवास

शेख वासीक यांची सायकलने हजयात्रेचा प्रवास
यवतमाळ -: आपल्या आणि इतर कोणत्याही देशांमधील मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा ही खूप प्रतिष्ठेची यात्रा मानली जाते.
मुस्लिम समाजाचे तीर्थस्थळ मक्का आणि मदिनाला खूप पाक आणि पवित्र मानले जाते, प्रत्येक मुस्लिम बांधवाची आपल्या जीवनामध्ये एकदा तरी या ठिकाणी जाण्याची इच्छा असते.हैदराबाद शहरातील असाच एक व्यक्ती शेख वासीक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने चक्क 1 एप्रिल पासून हजयात्रेसाठी येथील मक्का मदिना जाण्यासाठी सायकलने प्रवासाला सुरुवात केली आहे.
दिनांक 3 एप्रिल रोजी यवतमाळ शहरातील कळंब चौक येथे शेख वासीक यांचे पाच वाजताच्या सुमारास जंगी स्वागत करण्यात आले तसेच त्याच्या पुढील प्रवासात समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.हजयात्रेसाठी मक्का येथे जाणे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे असते, जो शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या कुटुंबियांचे पालनपोषण योग्य रीतीने होऊ शकते.
मक्का हे सौदी अरेबियामध्ये स्थित आहे. असे मानले जाते की, हे ठिकाण संपूर्ण जगाच्या मध्यभागी आहे. येथे जगाच्या सर्व भागांमधून लोक येतात आणि लाखो लोक एकत्र येऊन हज करतात व दुआ मागतात. कुराणमध्ये इस्लामच्या पाच स्तंभांचा उल्लेख आहे कलमे शहादत, नमाज, रोजा,जकात, आणि हज! मक्का आणि मदिना ही दोन शहरे इस्लाममध्ये फार पवित्र मानली गेली आहेत.
मक्का हे सौदी अरेबियामध्ये स्थित आहे. असे मानले जाते की, हे ठिकाण संपूर्ण जगाच्या मध्यभागी आहे. येथे जगाच्या सर्व भागांमधून लोक येतात आणि लाखो लोक एकत्र येऊन दुआ करतात.
कुराणमध्ये इस्लामच्या पाच स्तंभांचा उल्लेख आहे आणि मक्का आणि मदिना ही दोन शहरे इस्लाममध्ये फार पवित्र मानली गेली आहेत. हेच इस्लामचे उगम स्थळ असल्याचेही म्हटले जाते.
वासीक हे साकलिने हज यात्रेसाठी जात असताना यवतमाळात दाखल झाले असता त्यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली.