शेअर निर्देशांकात घसरण: आयटी, ग्राहक वस्तू, आरोग्य, रिऍल्टी क्षेत्राचे नुकसान

शेअर निर्देशांकात घसरण: आयटी, ग्राहक वस्तू, आरोग्य, रिऍल्टी क्षेत्राचे नुकसान

मुंबई – मार्च महिन्यापासून अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ सुरू करणार असल्याचे अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 581 अंकांनी कमी होऊन 57,276 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 167 अंकांनी म्हणजे 0.97 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 17,110 अंकांवर बंद झाला. अमेरिकेमध्ये व्याजदर वाढवण्याबरोबरच रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.

टेक महिंद्रा. एचसीएल टेक्‌, टायटन, इन्फोसिस, टायटन या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. ऍक्‍सिस बॅंक, स्टेट बॅंक, मारुती, कोटक बॅंक, सन फार्मा, इंडसइंड बॅंक कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली. अमेरिकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात वाढ केली नसली तरी मार्चपासून व्याजदरात वाढ करण्यात येईल, त्याचबरोबर भांडवल सुलभता कमी करण्यात येईल असे सांगितले आहे.

त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत असले तरी बॅंकांच्या शेअरच्या भावामध्ये आज पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. मात्र माहिती तंत्रज्ञान आणि औषधी क्षेत्राला नफेखोरीचा सामना करावा लागला, असे एलकेपी सेक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक रंगनाथन यांनी सांगितले. अमेरिकेच्या पतधोरणाकडे लक्ष असल्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारांत कमालीची अस्थिरता होती, मात्र आता हे पतधोरण जाहीर झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक विशिष्ट पातळीवर स्थिरावतील असे रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.

मुख्य निर्देशांकाबरोबरच स्मॉल कॅप आणि मिड कॅप सव्वा टक्‍क्‍यांपर्यंत घसरले. युरोप आणि आशियाई शेअर बाजारांमध्ये विक्रीचे वारे होते. अपेक्षेप्रमाणे परदेसी संस्थागत गुंतवणूकदारानी मंगळवारी 7,094 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली. काही काळ तरी हे गुंतवणूकदार विक्री करीत राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

आता अर्थसंकल्पाकडे लक्ष
गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणामुळे निर्देशांक अस्थिर होते. पुढील आठवड्यामध्ये भारताचा अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे कोणत्या क्षेत्राला काय मदत मिळते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होईपर्यंत निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.