शुभ मंगल सावधान! मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत अडकली लग्नबंधनात; पाहा लग्नाचा थाट

शुभ मंगल सावधान! मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत अडकली लग्नबंधनात; पाहा लग्नाचा थाट

मुंबई – लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ तिच्या बॉयफ्रेंड ‘सूरज नाम्बियार’सोबत आज (दि. 27) विवाह बंधनात अडकली आहे. गोव्यात मौनी रॉय आणि सूरज नाम्बियारचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं असून, या शाही विवाह सोहळ्यासाठी मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं होत. मात्र, करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लवकरच ही जोडी मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सोशल मीडियावर या विवाह सोहळ्याचे फोटो समोर आले असून अल्पावधीत हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. मौनी-सूरज यांच्या फोटोंवर सध्या लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव होत असून, सर्वांनीच या जोडीला शुभेच्छा दिल्या आहे. सूरजचा जन्म कर्नाटकमधील  बंगळूरूमध्ये झाला. तो दुबईमधील प्रसिद्ध बँकर आणि बिझनेसमॅन आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FilmyKalakar (@filmykalakar)

सूरजनं  जैन इंटरनॅशनल रेजिडेंशियल स्कूलमधून शिक्षण घेतले. 2008 मध्ये त्याने  बंगळूरूमधील आरवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सिव्हिल इंजीनियरिंगच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतले होते. सूरजला ट्रॅव्हल करायला आवडते. सूरजचा भाऊ नीरज नांबियार हा पुण्यामधील इव्हेंच मॅनेजमेंच कंपनीचा को-फाऊंडर आहे.

 

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.