शिवसेना युवासेना महिला आघाडी जय महाराष्ट्र तालुका शिवसेना महिला आघाडी च्या जागतिक महिला दिना निमित्ताने सन्मान स्त्री कर्तुत्वाचा सत्कार सोहळा कार्यक्रम व महिलांचे कबड्डी सामने आयोजन

दि. ८ मार्च २०२२ रोजी चिंचाळा गावात पहिल्यांदाच *उज्वलाताई प्रमोद नलगे* शिवसेना तालुका संघटिका महिला आघाडी यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिन सन्मान स्त्री कर्तुत्वाचा सत्कार सोहळा कार्यक्रम व महिलांचे कबड्डी सामने दत्त मंदिर ग्राउंड चिंचाळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राजमाता जिजाऊ, शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रम मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने *सौ. शिल्पाताई बोडखे* पूर्व विदर्भ महिला संघटक तथा विभागीय प्रवक्ता शिवसेना यांच्या आदेशानुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख *मा.संदीप भाऊ गिर्हे* यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख *मा.प्रा.निलेश भाऊ बेलखेडे* ,सौ. *मनस्वी ताई संदीप गिर्हे* अध्यक्ष्या, जिजा फाउंडेशन, चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सौ. निर्मलाताई कांबळे, सदस्य ग्रा. नागाळा सि. सौ.भारतीताई चीमुरकर सदस्य ग्रा. नागळा सि. सौ मायाताई धोटे सदस्य ग्रा. नागाळा सि. शिवसेना महिला आघाडी माजी जिल्हाप्रमुख कुसुमताई उदार होते. कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून सौ. रंजना ताई कांबडे ,सरपंच ग्रा. नागळा सि. सौ.शारदाताई हुसे, व्यवस्थापक खुशिया लोकसंचालित साधन केंद्र चंद्रपूर,सौ. सारिका ताई बावणे महाराष्ट्र पोलीस शिपाई,सौ. स्मिताताई चौधरी महाराष्ट्र पोलीस शिपाई,सौ. मालिनी ताई नंदकिशोर सगने समाजसेविका महिला राजसत्ता आंदोलन राज्य नियंत्रण महाराष्ट्र, सौ. प्रतिभाताई वांढरे अंगणवाडी सेविका, डॉ. डिंम्पल घुबडे B.A.M.S.M.D श्रीमती विमला देवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तथा हॉस्पिटल,सौ. पुनम ताई जंमपलवार अंगणवाडी मदतनीस,सौ. पुष्पा लहामगे अध्यक्ष महिला शक्ती सक्षमीकरण समिती चिंचाळा,सौ. साधना सवईकर आशा वर्कर, एड. नीता नागापुरे वकील, सलमा शेख ICRP (उमेद), या होत्या. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे,युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी मार्गदर्शन करतांना महिलांच्या यशस्वी गाथांची माहीती देत यापुढेही महिलांनी विविध क्षेत्रात सहभाग घेऊन महिलांनी पुरुषांबरोबर च समाजाचे नेत्रुुत्व करावे व महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी आपले योगदान देत युवती ,महिलांवर होणार्या अन्याया विरोधात एकजुटीने उभे राहावे असे आवाहन केले महिला रक्षणासाठी शिवसेना सदव्य आपल्या पाठीशी उभी राहिल असे प्रतिपादन केले. यावेळी आयोजक तालूका संघटिका उज्वला नलगे यांनी महिलांच्या मदतीसाठी सदैव महिला आघाडी पदाधिकारी तयार असून महिलांचा,सामाजिक,सांस्कुतिक, औद्योगिक विकास कसा होईल व आरोग्य,शिक्षणासंदर्भात ग्रामीण भागातील महिला,युवतींच्या प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहील अशी भावना व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला कबड्डी स्पर्धेत विजयी टीमला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका समन्वयक विकास विरुटकर, युवतीसेना उपजिल्हाधिकारी रोहीनीताई पाटील, विपषना ताई मेश्राम ,युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, युवासेना उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर लोनगाडगे,युवासेना उपशहर प्रमुख प्रफुल्ल चावरे, माजी युवा सेना तालुका समन्वयक सद्दाम कनोजे,रोहन नलगे, गोपाल सोनकुसरे, योगेश पुनवटकर, निखील घाडगे, आकाश पावडे, कुणाल उईके, सुश्मित गौरकार,रोनित नलगे, शुभम घागरगुंडे, तुषार लोणगाडगे, केतन शेरकी, चेतन कांबळी, विशाल बोरसरे, चेतन पावडे, मयुर वाभिटकर, दीपक पानघाटे, तेजस धनविजय, प्रवीण धनविजय, अविनाश पानघाटे, कुणाल पिसे, धीरज बोभाटे समस्त शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते