शिर्डीच्या ऐतिहासिक रामनवमी उत्सवास प्रारंभ; मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट

शिर्डीच्या ऐतिहासिक रामनवमी उत्सवास प्रारंभ; मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट
शिर्डी
श्री साईबाबांच्या (Saibaba) पुण्यभमीत यंदाच्या १११ व्या श्री रामनवमी उत्सवाला (Ram Navami festival) मोठ्या भक्तीमय वातावरण सुरुवात झाली असून यानिमित्त शनिवारी सकाळी श्री साईबाबा संस्थानचे (Saibaba Sansthan) अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.दरम्यान शिर्डीत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने तीन दिवसीय श्री रामनवमी उत्साहास प्रारंभ झाला असून शनिवारी पहिल्या दिवशी साईसंस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी श्रींच्या पोथीची मंदीरातून द्वारकामाईत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी पोथी, उपाध्यक्ष अँँड.जगदीश सावंत (Jagdish Sawant) व विश्वस्त अँड सुहास आहेर (Suhas Aher) यांनी प्रतिमा व विश्वस्त अविनाश दंडवते (Avinash Dandwate) यांनी विणा घेवुन सहभागी झाले होते.
याप्रसंगी विश्वस्त सर्वश्री सचिन गुजर, राहुल कनाल, सुरेश वाबळे,महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.श्री रामनवमी उत्सवानिमित्त व्दारकामाई मंदिरात अखंड पारायणास सुरवात करण्यात आली.
यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी चैतालीताई काळे यांनी केले.तसेच श्री साईबाबा समाधी मंदिरात त्यांच्या हस्ते पाद्यपुजा करण्यात आली. यावेळी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व परिसरात उडीसा राज्यातील भुवनेश्वर येथील दानशूर साईभक्त सदाशिब दास यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट व शिंगवे येथील ओम साई लाईटींग डेकोरेटर्स निलेश नरोडे यांच्या वतीने विद्युत रोषणाई करण्यात आली.