शहरात मोकाट कुत्र्यांच्या वावर वर सामाजिक कार्यकर्ते सैय्यद हसन यांनी दिलेल्या तक्रारीवर प्रशासनाने घेतली दखल

यवतमाळ (वासीक शेख) : शहरात उघड्यावर मांस विक्री मुळे मोकोट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.धावत्या वाहनावर भुंकत पाठलाग करीत असल्याने वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे.असंच एका घटनेत कळंब चौक यवतमाळ येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते सैय्यद हसन सैय्यद उस्मान हे दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी नमाज पठण करण्याकरिता यवतमाळ येथील इस्लामपूर भागात असलेली गौसिया मस्जिद मध्ये गेले असताना त्या परिसरात अवैध रीत्या सुरु असलेले मास विक्रीचे दुकानांचे समोर मोकाट कुत्र्यांचा वावर असतात त्यातूनच एका कुत्र्याने त्यांना चावले व त्यांना दुःख पात झाला ते उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात गेले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले उपचार झाल्यानंतर त्यांच्या मनात आला की जसे मी या कुत्र्यांचे शिकार झालो आहोत तसे इतर कोणी त्यांचे शिकार होऊ नये याकरिता त्यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी एका निवेदन पत्राद्वारे मा. मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ,मा. तहसीलदार साहेब यवतमाळ,मा. उपविभागीय अधिकारी साहेब यवतमाळ,मा.पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ,मा.जिल्हा सहाय्यक आयुक्त साहेब नगरपरिषद प्रशासन विभाग यवतमाळ यांना विनंती अर्ज दिले तसेच मोकाट कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी निवेदनातून केली.

शहरात अवैध रीत्या रस्त्यावर सुरु असलेले मास विक्रीमुळे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे.रात्रीदरम्यान शहरातल्या सर्व मार्गावर धावत्या वाहनावर कुत्रे भुंकत असून लोकांचे पाठलाग करतात.याच्यात सर्वात जास्त पांढरकवडा रोड ते जुने नागपूर बायपास या मार्गावर रस्त्यावर मास विक्रीचे दुकान असल्याने या मार्गात नेहमी मोकाट कुत्र्यांचे सावट सुरु राहते या मोकाट कुत्र्यांमुळे वाहनधारक तसेच या मार्गावरून पैदल चालणारे शाळकरी मुलांना तसेच इतर नागरिकांना चांगलेच धास्तीत आले आहे.रस्त्यावर मधोमध उभे राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अशातच रस्त्यावरील दुभाजकावरून धावत येताना समोरून येणाऱ्या वाहनाकडे धाव घेत असल्याच्या घटना घडताना दिसून येत आहे. अशातूनच या मार्गावरील असलेल्या मोकाट कुत्र्यांचा वावर असून सदर कुत्र्यांनी नुकतेच एका वराहावर हल्ला चढविला होता. सदर परिसरात 20 ते 25 मोकाट कुत्रे असून ते परिसरातील नागरिकांवर रात्रीदरम्यान भुंकतात. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सैय्यद हसन सैय्यद उस्मान यांचेकडून करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते सैय्यद हसन सैय्यद उस्मान यांची या मागणीची दखल घेत नुकतेच जिल्हा सहायक आयुक्त साहेब नगरपरिषद प्रशासन विभाग यवतमाळ यांच्या वतीने 1 मार्च 2022 रोजी तसेच दिनांक 2 मार्च 2022 रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या वतीने मा.मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांचे नावाने या विषयान्वये कारवाई करण्याचे आदेश परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आता सर्व सामान्यांचे लक्ष मा.मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ हे उघड्यावर सुरू असलेले मास विक्रीवर बंदी घालणार का ? तसेच या मोकाट कुत्र्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
