शरद पवार करोना पॉझिटीव्ह येताच रोहित पवार भावूक; म्हणाले, आजोबा तुम्ही तर…

शरद पवार करोना पॉझिटीव्ह येताच रोहित पवार भावूक; म्हणाले, आजोबा तुम्ही तर…

मुंबई  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे पवार यांनी सांगितले असून काळजीचे कोणतेही कारण नाही असे ते म्हणाले आहेत. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार पवार उपचार घेत आहेत. याशिवाय संपर्कात आलेल्यांना पवारांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

 

शरद पवार करोना पॉझिटीव्ह असल्याचं वृत्त आल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यातच शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांचं ट्विट चर्चेत आहे.

 

आजोबा शरद पवार पॉझिटीव्ह आल्यामुळे रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो ! तुम्ही लवकर बरे व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’

 

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.