विविध सामाजिक उपक्रमांनी प्रगट दिन साजरा

विविध सामाजिक उपक्रमांनी प्रगट दिन साजरा

यवतमाळ – स्थानिक गणेश नगर विद्या नगरी येथील विसावा विश्रांती स्थळ या ठिकाणी दर वर्षी प्रमाणे राजुभाऊ बोडखे मित्र मंडळातर्फे संत गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहाने तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मागील वर्षापासून गरीब होतकरु विद्यार्थींनींना व युवतींना शालेय साहित्य व जिवनावश्यक वस्तुंची मदत केली जाते. या वर्षी सुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला व 20 विद्यार्थींनींना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या शुभ हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे, जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र गायकवाड, शहर महिला कॉंग्रेस कमेटीच्या अध्यक्षा उषाताई दिवटे, शिवसेना महिला आघाडी संघटक लताताई चंदेल, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ बोडखे, सृष्टी दिवटे, श्‍वेता दिवटे, बिडकर ताई आदि मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, दिनदुबळ्यांची मदत करणारे व्यक्तीमत्व संत प्रवृत्ती जोपासतात तसेच आपल्या सामाजिक कार्यातून राजुभाऊ बोडखे यांनी लोकांच्या घरात मन बसवून परिसरातील नागरिकांची मने जिंकली असून त्यांच्या अविरत कार्याबद्दल त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या प्रसंगी बोलतांना जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र गायकवाड म्हणाले की, जगाला संताशिवाय पर्याय नाही, संतांचे विचारच समाजाला तारू शकतात असे प्रभावी विचार त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. मागील दोन दिवसापासून राजुभाऊ बोडखे मित्र मंडळाचे सदस्य अविरत परिश्रम घेत प्रगट दिनाचे आयोजन यशस्वी केले. प्रगट दिनी सकाळी 7 वाजता मदनलाल कन्हैयालाल मिश्रा यांनी सहपत्नीक कळस स्थापना करुन श्रींचे पुजन केले तर नंदादिप महिला भजनी मंडळ गणेश नगर व भक्ती महिला भजन मंडळ यांनी बहारदार भजन प्रस्तुत करुन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक राजुभाऊ बोडखे, राजेंद्र पराळे, धनंजय काळे, विनोद ढोणे, दिनेश शेळके, अजय किन्हीकर, राजु गिरी, प्रदीप नस्करी, किशोर वानखडे, रवि दुबे, संदीप सहारे, ऋषी मोरे, रोशन सुर्यवंशी, दिनेश श्रीवास, अमित आडे, अवि मसराम, सौरभ तांगडे, विलास जोशी, संजुभाऊ तांगडे तसेच महिला कार्यकर्ता सविता बोडखे, साक्षी काळे, प्राप्ती पराळे, कु. ईशा शेळके यांनी अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाला तालुका कॉंग्रेस कमेटीच्या उपाध्यक्षा निशा वाघाडे, शहर कॉंग्रेस कमेटी सचिव सचिन नेवारे, शहर कॉंग्रेस कमेटी महिला सचिव संगिताताई उमरे, शिलाताई इंगोले, प्रियंका बिडकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन राजुभाऊ गिरी (लोहीकर) यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, कार्यक्रमाचे संयोजक राजुभाऊ बोडखे यांनी केले.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.