विकास सोडून मशीदीवरील भोंग्याचे राजकारण समाजासाठी घातक शेतकरी नेते सिकंदर शहा यांचे वक्तव्य

विकास सोडून मशीदीवरील भोंग्याचे राजकारण समाजासाठी घातक
शेतकरी नेते सिकंदर शहा यांचे वक्तव्य
प्रतिनिधी यवतमाळ
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळयासमोर ठेऊन राजकीय नेते बेताल वक्तव्य करीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट मशिदीवरील भोंग्याशी संबंधीत वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विकासाचे मुद्दे सोडून मशीदीवरील भोंग्याचे राजकारण समाजासाठी घातक ठरु शकते असे वक्तव्य शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केले आहे.
लवकरच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. या मुंबई महानगर पालिकेचे बजेट जवळपास 47 हजार कोटी आहे. त्यामुळे या निवडणूकीत राजकीय नेत्यांना अधिकचा रस असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक कुठलीही असली तरी त्यामध्ये निवडून येण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नांची परकाष्ठा करीत असतात. मात्र सध्या ज्याप्रमाणे स्वताचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धार्मीक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले जात आहे ते समाजासाठी घातक असल्याचे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांचा नव निर्माण पक्ष स्वताच्या अस्तित्वासाठी धडपड करीत आहे. त्यांनी मुंबई मधील सामाजिक समस्यांना उजागर करण्याचे सोडून थेट धार्मीक विषयांत हात टाकणे सुरु केले आहे. एखाद्या ठिकाणी मशीदीवरील भोंग्यांचा आवाज जास्त असल्यास तो आवाज नियमानुसार डेसीबल मध्ये असावा अशी मागणी केली जाऊ शकते मात्र तसे न करता थेट मशीदीसमोर जाऊन भोंग्यावर हनुमान चालीसा वाजविण्याचे आवाहन करण्यात आले. हा सर्व प्रकार समाजात धार्मीक तेढ निर्माण करणारा आहे. या वक्तव्याचे पडसाद उमदतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपाला कुणाचीही राजकीय साथ मिळत नसल्याने ते आता राज ठाकरे यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणानंतर भाजपाचे नेते राज ठाकरे ख-या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारे नेते असल्याचे वक्तव्य करीत आहे. हा सर्व प्रोत्साहन देण्याचा प्रकार सुध्दा समाजासाठी घातक ठरु शकतो. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणा-यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे.
विकासाचे राजकारण करा
मुंबईत मोठया प्रमाणात नागरीकांच्या समस्या आहे. रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रेल्वे लाईन परीसरातील नागरीकांच्या समस्या, पावसाच्या पाण्याचा निचरा यासह अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहे. या सोडविल्यास नागरीक मनसेला डोकयावर घेतील. मात्र मुळ विकासाचे प्रश्न सोडून तरुणांची डोकी भडकविण्याचा हा प्रयत्न समाजासाठी घातक ठरु शकतो असे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे.