वाशिम जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी

वाशिम जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी।कारंजा

कोरोना महामारी मुळे सर्व सामान्य नागरिकांचे आर्थिक स्तोत्र नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.महाराष्ट्रात गेल्या २५ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने जनजीवन त्रस्त झाल्यामुळे सर्वांसमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.या काळात कोविड १९ नियमावली नुसार विविध बाबींवर निर्बंध लावण्यात आले.यामध्ये आठवडी बाजारावर निर्बंध असल्यामुळे अजूनपर्यन्त वाशिम जिल्ह्यातील आठवडी बाजर सुरू करण्यात आलेले नाही यामुळे सर्वसामान्य जनतेसह विविध लघु व्यवसायी तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वाशिम जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा हा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन वाशिम जिल्हाधिकारी यांना ४ मार्च रोजी कारंजा तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आले यावेळी कारंजा नप नगरसेवक जाकिर शेख,राफीकुररहेमान,काजी मुदस्सीर,हमीद शेख आदी उपस्थित होते.

Updated : 4 March 2022 3:03 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.