वार्षिक दिनदर्शिकेत महापुरुषांची जयंती च्या चुकीच्या तारखा प्रकाशीत केल्याप्रकरणी, प्रकाशक व संयोजक यांचेवर कारवाई करा!

राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
बातमी,पुसद……………………….
नवीन वर्ष म्हटलं की विविध पक्षांचे तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी वार्षिक दिनदर्शिका म्हणून आपल्या संघटनेची व पक्षाची प्रसिद्धी व्हावी या दृष्टिकोनातून दिनदर्शिकेचे कॅलेंडर स्वरूपात काढत असतात ती नाविन्यपूर्ण पद्धत सर्वत्र आहे.
मात्र सन 20 22 या नवीन वर्षाच्या संदर्भात दिनदर्शिका भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने प्रकाशित करण्यात आली असून या दिनदर्शिके मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सरकारी कॅलेंडर प्रमाणे 19 फेब्रुवारी हा जन्म जयंती तारीख लिहिणे बंधनकारक असून या दिनदर्शिके मध्ये *18 फेब्रुवारी* जयंतीदिन दाखवण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व प्रकाशक यांनी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर टाळल्याचे चे निदर्शनास येते भारतीय जनता पार्टी चा हा कुटील पणा डाव आहे व ते एवढ्यावरच थांबला नसून भाजपाच्या याच दिनदर्शिकेत मार्च महिन्यात येणारी तिथीनुसार ची जयंती 21 मार्च या तारखे ऐवजी 31 मार्च दाखवण्यात आली आहे.
वरीलपैकी दोन्ही चुका लक्षात घेता भाजपने ही चूक जाणीवपूर्वक केल्याचे दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शिवप्रेमीची नाराजी व्यक्त केल्या जात आहे महाराष्ट्रात सतेत येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीनी अशाच प्रकारे *शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ* असे ब्रीदवाक्य घेऊन प्रचाराची रणधुमाळी सुरू करून विजय प्राप्त केला होता. परंतु सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा विसर पडला असून अशा स्वार्थी भारतीय जनता पक्षाच्या संयोजक व प्रकाशक यांचेवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या चुकीच्या तारखा च्या दिनदर्शिका वितरित केल्या त्या संपुर्ण जमा करण्यात यावे या महाराष्ट्रातील संपूर्ण शिवप्रेमींची मागे माफी मागण्यात अशी मागणी पुसद येथील शिवप्रेमींनी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर विजय बाबर, सोपीनाथ माने, कैलास मस्के, विजय निखाते, अभिजीत पानपट्टे ,शंकर माटे ,अरुण पवार ,सचिन होलगे, ज्ञानेश्वर तोडक, इत्यादी शिवप्रेमींच्या निवेदनावर सह्या आहेत.