वाढत्या महागाईच्या विरोधात युवासेनेचे थाळी बजाओ आंदोलन

वाढत्या महागाईच्या विरोधात युवासेनेचे थाळी बजाओ आंदोलन
रस्त्यावर उतरुन थाळया वाजवित युवासैनिकांनी केला केन्द्र सरकारचा निषेध
प्रतिनिधी यवतमाळ
राज्यात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. याचा निषेध करण्यासाठी आज युवासेनेकडून यवतमाळात जुन्या बसस्थानक समोर थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. युवासैनिकांनी जिल्हाभरात विविध ठिकाणी केन्द्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरुन थाळी वाजवित घोषणाबाजी केली. युवासैनिकांच्या या अनोख्या थाळी बजाओ आंदोलनाने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते माजी मंत्री आमदार संजय राठोड, युवासेना सह सचिव सागर देशमुख व युवासेना विस्तारक दिलीप घुगे, रुपेश कदम कोअर कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले.
राज्यात वाढत्या महागाईने उच्चांक गाठला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. आज यवतमाळात पेट्रोल 117 रुपये तर डिझेल सुध्दा शंभरच्या पार गेले आहे. केन्द्र सरकारच्या चुकीच्या नितीमुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. दरम्यान वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना तसेच युवा सेनेच्या पदाधिका-यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज युवासेनेकडून यवतमाळात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी ‘थाली बजाओ और खुशिया मनाओ’ असे अनोखे पोस्टर्स हातात घेऊन अनेक युवासैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटु बांगर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विशाल गणात्रा, अमोल धोपेकर जिल्हा समन्वयक, युवासेना, श्रीकांत मिरासे जिल्हा चिटणीस, युवासेना, हितेश खालपाडा युवासेना व्यापारी जिल्हा संघटक, गिरीजानंद कळंबे उपजिल्हा युवा अधिकारी, योगेश वर्मा उपजिल्हा युवा अधिकारी, विजय इंगळे तालुका युवा अधिकारी, पवन शेंद्रे तालुका युवा अधिकारी, निलेश बेलोकर शहर युवा अधिकारी, भूषण काटकर शहर युवा अधिकारी, निमिषा पोपट जिल्हा युवती अधिकारी, आकाश चव्हाण, कार्तीक लांजेवार, अभिनव वाडगुरे, अनिकेत थोरात, गोलु मिरासे, पप्प गजबे, शैलेश तांबे, प्रतिक पिंपळकर, राहुल गंभिरे, आदित्य गंभीरे, रुषीकेश थोरात, सुरज राठोड, आकाश चव्हाण, विजय माळवी, महेश पवार, निरव गढीया, राजु राऊत, श्याम थोरात, किशोर मडावी, संदीप देवकते, राजेन्द्र तपसे, श्याम बावणे, स्वप्नील मनेश्वर, सुरज धवने, प्रविण कोडापे, शुभम तिडके, आकाश पिसे, अजय दरोडे, अजय दरोडे, अक्षय पुसदकर, मार्शल राठोड, हरीश नेवारे, गजानन आढाव, संजय राठोड, निमिषा पोपट, स्वाती कोकोट, हर्षदा चिखलकर, प्रतिक्षा राऊत, शुभांकर भट, पवन अराठे, विनीत हातगावकर, सुमित हातगावकर, निलेश यादव, देवानंद लोडगे तसेच मोठया संख्येत युवासैनिक उपस्थित होते.
लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
कोरोना पळवून लावण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी थाळी वाजवायला सांगीतली होती. त्याचप्रमाणे आम्ही सुध्दा आज थाळी वाजवून महागाई दुर करण्यासाठी आंदोनल केले. मोदी सरकार देशात सत्तेत आल्यापासून महागाई प्रचंड वाढली आहे. दुसरीकडे भाजपा मात्र निवडणूकीतील विजयोत्सव साजरा करण्यात दंग आहे. त्यामुळेच या महागाईच्या विरोधात आंदोलन करुन आम्ही केन्द्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
विशाल गणात्रा
युवासेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ