वाघापुर टाकीची पाईपलाईन फुटली, अनेक घरांमध्ये शिरले पाणी; नागरिकांची उडाली तारांबळ

वाघापुर टाकीची पाईपलाईन फुटली, अनेक घरांमध्ये शिरले पाणी; नागरिकांची उडाली तारांबळ

वाघापुर टाकीची पाईपलाईन फुटली, अनेक घरांमध्ये शिरले पाणी; नागरिकांची उडाली तारांबळ

वाघापूर परिसरात उन्हाळ्यात आला पूर

यवतमाळ : शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ३०२ कोटींच्या या योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. रविवारी रात्री ९.४५ वाजता वाघापूर येथील काशीकर महाराज मठाजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तपासणीदरम्यान फुटली यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

रस्त्यावरून अक्षरश: पाण्याचे लोट वाहू लागले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. जीवन प्राधिकरणाकडून नव्याने प केलेल्या पाणीपुरवठा योजनेची तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये ठिकाणी पाईपलाईन प फुटत असल्याचे दिसून येते. २०१७ पासून सुरू असलेली ही पाणीपुरवठा त योजना अजूनही पूर्णत्वास आलेली नाही. रविवारी रात्री अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे काशीकर महाराज मठ परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली.

घरातील वस्तूचे मोठे नुकसान झाले.पाणीच पाणी वाहू लागल्याने तपासणी करत असलेल्या कामगारांची सुद्धा तारांबळ उडाली, त्यांना काय करावे समजत नव्हते. पूर आल्याने परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. पाणी घरात जाऊ नये म्हणून नागरिकांची धडपड सुरू होती. एकूणच प्राधिकरणाच्या कारभाराबद्दल परिसरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पाईपलाईन फुटून आलेल्या पुरात झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार ? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

अनुभव शून्य कंत्राटदारांमुळे अमृत योजनेचा बोजवारा उडाला

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजना तत्कालीन पालकमंत्री आमदार मदन येरावार यांनी अथक परिश्रमाने मंजूर करून आणली.मात्र या योजनेचा अक्षरशा बोजवारा उडाला आहे असे चित्र आताच्या घडीला निर्माण झाले आहे.कारण अमृत योजनेचा कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने अमृत योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी सब कंत्राटदार नेमले.विशेष म्हणजे या सब कंत्राटदाराला कुठलाही अनुभव नसल्याने अनुभव शून्य कंत्राटदारांना काम देण्यात आल्याने ठिकाणी लिकेज व पाईप फुटण्याचे प्रकार दररोज घडत आहे.यामुळे योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच देखभाल दुरुस्तीचे बिल या योजनेतून काढल्या जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात येत आहे.

Updated : 4 April 2022 6:05 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.