वाघाडी येथे महीला राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे महीला हक्क मार्गदर्शन शिबीर संपन्न

वाघाडी येथे महीला राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे महीला हक्क मार्गदर्शन शिबीर संपन्न

दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे माननीय खा. सुप्रिया ताई माननीय रुपाली ताई चाकणकर, अध्यक्ष महीला आयोग तथा अध्यक्ष महीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व माननीय माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष संदीप भाऊ बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश संघटक सचिव प्रियंका पाटील यांनी आयोजीत केलेल्या महिला अत्याचारा वरील महिलांचे हक्क याबाबत मी सुद्धा एक मुलगी आहे. बहीण आहे, पत्नी आहे, मैत्रीण आहे, आई आहे.

बस! आता तरी थांबा

या घोषवाक्या सहित मार्गदर्शन शिबीर अॅड. नरेंद्रजी मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शना वाघाडी या वस्तीत पार पडले. या कार्यक्रमामध्ये महीला घरगुती हिंसाचार महीलांचे हक्क, महीलांचे कामावर होणारे अत्याचार युवतीची होणारी छेडखानी इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष सारिका ताई ताजणे, जिल्हा उपाध्यक्ष लताताई खांदवे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणा ताई गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणा ताई राठोड, जिल्हा सरचिटणीस भावना लाई लेडे, जिल्हा सरचिटणीस चेतना ताई राऊत, स्मिता ताई ढेकळे कार्यक्रमात वस्तीतील मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या समन्वयक शहराध्यक्ष योगिता ताई मासाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Updated : 2022-01-25T02:26:36+05:30

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.