वसुंधरा फाउंडेशनच्या महिला मेळाव्यात महिलांचा सत्कार व भव्य नृत्य स्पर्धा

वसुंधरा फाउंडेशनच्या महिला मेळाव्यात महिलांचा सत्कार व भव्य नृत्य स्पर्धा
दोन वर्षाच्या नंतर महिलांनी घेतला नृत्य स्पर्धेचा आनंद
यवतमाळ -: तीन वर्षापूर्वी यवतमाळ शहरात सामाजिक कार्य तसेच महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी वसुंधरा फाउंडेशनची स्थापना झाली या फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये विविध सामाजिक उपक्रमासह महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आले. महिलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही. नववर्षारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताचे औचित्य साधून वसुंधरा फाउंडेशनने महिला मेळाव्यामध्ये खास महिलांसाठी भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते.यवतमाळ शहरातील संकट मोचन रोडवर असलेल्या महेश भवन येथे दि.3 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री मोहोळ,योगिता मासाळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्त्या माधुरी योगेश चौधरी,कवयित्री मंदा वाघमारे,सामाजिक कार्यकर्त्या किरण शिरभाते,किर्तनकार ह.भ.प कु.सई राम पंचभाई यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसुंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा वर्षा पडवे यांनी प्रास्ताविक व्यक्त करून महिलांना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असे त्यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.तसेच विद्या ब्राह्मणकर यांनी आपल्या विचार मांडले.या नृत्य स्पर्धेत एकूण एकल नृत्यामध्ये 20 स्पर्धकांनी तर समूहनृत्य मध्ये 8 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.नृत्य स्पर्धेच्या सुरुवातीला कु.सुहानी सदानंद पडवे हिच्या गाण्याने सुरुवात करून नृत्यस्पर्धेची सुरुवात प्रतिभा मुळे यांच्या देवा श्री गणेशा या गाण्याच्या नृत्याने प्रारंभ झाला.
नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. सारिका शहा,डॉ.अमृता पुनसे तसेच दीपमाला भेंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली असून या नृत्य स्पर्धेमध्ये समूह नृत्याचे प्रथम बक्षीस राजघराना यांनी पटकाविले असून द्वितीय बक्षीस सिंहझेप समर्पण सखी तृतीय बक्षीस नृत्यांगना तसेच प्रोत्साहनपर बक्षीस संस्कृती नृत्य ग्रुप,मडकोना यांनी पटकाविले तर एकल नृत्यामध्ये प्रथम बक्षीस धनश्री जवके,द्वितीय बक्षीस शानू राठोड,तृतीय बक्षीस मंजरी गंजीवाले तर प्रोत्साहनपर बक्षीस दीप्ती धोटे,नताशा सिंग यांनी पटकाविले.या नृत्य स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक यादव सौ स्वाती भगत यांनी काम पाहिले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पंचभाई तर आभार स्मिता ढेकळे यांनी व्यक्त केले. या नृत्य स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा वर्षा पडवे,प्रिया गायनर,प्रतिभा मुळे,किरण शिरभाते, जयश्री बोबडे, वर्षा लोखंडे,निर्मला आडे,स्मिता ढेकळे,सोनाली पंचभाई,सपना बत्तलवार,योगिता मासाळ,अंजली रापर्तीवार,अमृता वडेरा,सुहानी पडवे,दिव्या ठाकरे,आस्था कोरडे,तृप्ती मोरे यांनी परिश्रम घेतले.