वर्कस फेडरेशनतर्फे अभियंता दांडगव्हाल यांचा सत्कार..

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर
—————————–
उपविभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा नायगाव येथे उपकार्यकारी अभियंता गणेश कांतीलाल दांडगव्हाल हे नव्याने रुजू झाल्याने वर्कस फेडरेशनचे सचिव विक्रम भालेराव यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
विद्युत वितरण कंपनी शाखा नायगांव येथे यापूर्वी श्री गटुरवार हे कार्यरत होते, पण त्यांच्याकडून समाधानकारक कामे ही झाली नाहीत व सदर शाखेतील कामगार कर्मचारी यांना देखील श्री गटुरवार यांच्याकडून न्याय तर मिळालाच नाही परंतु नाहक त्रास झाला अशा भावना कामगार कर्मचारी व्यक्त करीत नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता गणेश दांडगव्हाल यांच्याकडून निश्चितच आपणास न्याय मिळेल अशा अपेक्षा करीत वर्कस फेडरेशन संघटनेचे कामगार कर्मचारी तालुका अध्यक्ष गंगाधर रेडेस, उपाध्यक्ष नागोराव इंगळे, सचिव विक्रम भालेराव, उपाध्यक्ष गुंडमवार, सहसचिव सम्रत सूर्यवंशी, इत्यादींनी दांडगव्हाल यांचा सत्कार करून शुभेच्छा दिले. यावेळी मठवाले, पाटील, सरदार खान, पठाण, वाघमारे, सूर्यवंशी, चिंचाळे, कारतोळे, वरणे,तर लाईनमण गंजेवार.बोङके.व सर्व कर्मचारी उपस्थिती होते.