वणी पं.स.च्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात भिषण आग. (महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक.

वणी पं.स.च्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात भिषण आग. (महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक.

वणी:– वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयास २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास बचत गटाच्या कार्यालया कडून आग लागून संपूर्ण इमारतीला आगीने वेढले होते.यात महत्त्वाचे दस्तावेज संपूर्ण जळून खाक झाले.अग्निशामक दलाचे वाहन वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.शिक्षण विभागाच्या या कार्यालयात शिक्षण, तालुका अभियान व्यवस्थापण कॉमण सर्व्हिस सेंटर, बचत अशा विभागाचे काम येथे चालत असे.२५ फेब्रुवारी रोजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी दोन वर्षा नंतर समन्वय समिती बैठक घेण्यात आली होती.या बैठकीत आमदार यांनी विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.हि बैठक सायंकाळी सहा वाजता संपन्न झाली.अशातच अचानक रात्री ८:३० वाजता चे दरम्यान शिक्षण विभागाच्या कार्यालयास आग लागली.त्या आगीत कार्यालयातील महत्त्वाचे संपूर्ण दस्तावेज व इतर साहित्य त्यात टेबल,खुर्च्या,कपाटे, प्रिंटर मशीन, झेरॉक्स मशीन,कॉम्पुटर, पंखे इत्यादी साहित्याची राख रांगोळी झाली.आग लागली असता कर्तव्यावर असलेले जमादार वासुदेव नारनवरे यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले व आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.अग्निशामकदल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी युध्दपातळीवर प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मागील तीन दिवसा अगोदर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फायर ऑडिट करण्याचा संदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यात शहरातील सर्व शासकीय कार्यालये, खाजगी हॉस्पिटल्स, शाळा व महाविद्यालयात फायर ऑडिट करावे अशी मागणी केली होती. अवघ्या तीन दिवसांत शिक्षण विभागाच्या कार्यालयास आग लागली.ही आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.प्राथमिक दृष्ट्या शॉट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.नेमकी आग कशामुळे लागली हे तपासा अंती निष्पन्न होणार आहे.

Updated : 1 March 2022 7:10 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.