लोकशाही दिनातील तक्रारी बेदखल प्रकरणे निकाली काढा कक्षाधिकाऱ्यांच्या सूचना

लोकशाही दिनातील तक्रारी बेदखल

प्रकरणे निकाली काढा

कक्षाधिकाऱ्यांच्या सूचना

लोकशाही दिनातील तक्रारी बेदखल

प्रकरणे निकाली काढा

कक्षाधिकाऱ्यांच्या सूचना

यवतमाळ : सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निरसन व्हावे,यासाठी जिल्हास्तरावर दर सोमवारी लोकशाही दिन भरवला जातो.यात तक्रारीही दाखल होत असल्या तरी त्या अनेक दिवसांपासून बेदखल आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रारींचा निपटारा लागत नसल्याने त्यांना थेट सामान्य प्रशासन विभागाच्या कक्षाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या गुरुदेव युवा संघाच्या पत्राची कक्ष अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.

संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी लोकशाही दिनात आजपर्यंत ७ तक्रारी दाखल केल्या मात्र त्यांचा निपटारा झाला नाही. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने २६ सप्टेंबर २०१२ च्या शासन निर्णयात एकत्रित मार्गदर्शक तत्वांना विहीत केले आहे. क्षेत्रीय स्तरावरील सर्व तक्रारी वा अर्ज ३० दिवसाच्या आत निकाली काढण्याचे आदेश आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. तक्रारदारांना जिल्हा कचेरीत केवळ येरझारा माराव्या लागत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. लोकशाही दिनातील सर्व तक्रारींचा शक्य तितक्या लवकर निपटारा न झाल्यास सर्व तक्रारदारांना एकत्र घेऊन जिल्हाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन उभे करणार,असा इशारा गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

: ‘गुरुदेव’कडून तक्रारींचा खच

गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी ७ लोकशाही दिनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये मूलभूत प्रश्न,पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी, शौचालय अनुदान मिळावे,पिंपळगाव आगग्रस्त कुटूंबियांना शासकीय मदत,पिवळ्या पट्ट्याची मागणी,सिग्नल सुरू करावे, नप शाळांचा प्रश्न आझाद मैदानाची डागडुजी, कोलाम पोड येथे मूलभूत सुविधा पुरविण्यासोबत अन्य प्रश्न मांडले आहे,मात्र यातील एकही तक्रार निकाली निघाली नाही.

Updated : 4 April 2022 10:12 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.