लेखी व तोंडी आश्वासनानंतर मुबारक तंवर यांचे उपोषण मागे. काही मागण्या मान्य.

लेखी व तोंडी आश्वासनानंतर

मुबारक तंवर यांचे उपोषण मागे.

काही मागण्या मान्य.

लेखी व तोंडी आश्वासनानंतर

मुबारक तंवर यांचे उपोषण मागे.

काही मागण्या मान्य.

आर्णी ( वार्ता ) :-

सावळी सदोबा व परिसरात विविध मागण्या करिता 5 एप्रिल मंगळवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी दिला होता.

संबंधित विभागाने त्यापैकी काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्या शक्य तितक्या लवकर सोडविण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिल्याने मुबारक तंवर यांनी 5 एप्रिल रोजी चे आमरण उपोषण तात्पुरते मागे घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावळी सदोबा व परिसरात गेल्या महिन्याभरापासून विद्युतचा सततचा लपंडाव व कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा यामुळे सर्व सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते , विद्युत पुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा व शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी सुरळीतपणे चालाव्या यासाठी लागणारा विद्युतचा पुरवठा पूर्ण होल्टेजने देण्यात यावा अशी मुख्य मागणी होती.

याबाबत यवतमाळ चे विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. वैद्य व आर्णी कार्यालयाचे पवन शेडामे, उपकार्यकारी अभियंता यांनी 5 एप्रिल रोजी मुबारक तंवर यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लेखी व तोंडी आश्वासन दिले की यापुढे विद्युतचा पुरवठा या भागात सुरळीत व नियमितपणे राहील व तो पूर्ण दाबाने देण्याचा प्रयत्न राहील तसेच विद्युत पुरवठा मधील ज्या काही त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न करू असे लेखी व तोंडी आश्वासन विद्युत मंडळाच्या संबंधित अधिकार्‍यांनी दिले.

सावळी सदोबा व परिसरातील श्रावणबाळ व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊन ठेपलेली आहे, या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तातडीने अनुदान जमा करावे अशी मागणी मुबारक तंवर यांनी केली होती ,याबाबत आरणीचे तहसीलदार श्री. परशराम भोसले यांनी दिनांक 5 एप्रिल रोजी मध्यवर्ती सहकारी बँक सावळी सदोबा येथील बॅंकेत 22 लाख 54 हजार 400 रुपयांचा धनादेश तर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सावळी सदोबा येथे 7 लाख 64 हजार 400 रुपयांचा धनादेश जमा करीत असल्याचे प्रत्यक्ष भेटीत मुबारक तंवर यांना सांगितले.

झापरवाडी येथील पांदन रस्त्याबाबत यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे श्री. विनय कुटे,उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग,आर्णी व ऐस.आर.पाटील कनिष्ठ अभियंता आर्णी व तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. तुंडलवार यांनी प्रत्यक्ष झापरवाडी येथे जाऊन पांदन रस्त्याची गावकऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून मोजमाप करून घेतले हे काम पुढील पंधरवड्यापर्यंत मंजूर करू असे आश्वासन झापरवाडी येथील नागरिकांना प्रत्यक्ष गावात जाऊन दिले तर उमरी ( कापेश्वर ) येथील वार्ड नंबर 2 मधील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. चोपडे यांनी प्रत्यक्ष उमरी गावात जाऊन मोका पाहणी करून याच आठवड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जे जे कामे करावे लागेल त्या कामाला सुरुवात करू असे आश्वासन उमरी येथील वार्ड नंबर 2 मधिल महिला पुरुषांना दिले , तसेच खडका तांडा येथील देवलाल‌ केरई यांच्या कुटुंबातील सदस्यांना 8 अ देऊ असे आश्वासन दिल्याने मुबारक तंवर यांनी 5 एप्रिल चे आमरण उपोषण मागे घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.

संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी व तोंडी आश्वासन पाळले नाही तर भविष्यात पुन्हा लोकांच्या हितासाठी आपण आमरण उपोषणाला बसू असे मुबारक तंवर यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Updated : 6 April 2022 4:47 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.