लिंगायत पाडवा पहाटला उत्स्फूर्त प्रतिसाद

चैत्र गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात मंदमंद सुरांच्या यंदाची लिंगायत पाडवा पहाट रसिक श्रोत्यांच्या मनात अभावितपणे कोरल्या गेली.बसव क्लब वीरशैव हितसंवर्धक मंडळ,वसुधा प्रतिष्ठान,लिंगायत महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत लिंगायत पाडवा पहाट या भक्तिमय संगीतमय कार्यक्रमाला मराठी नववर्षाच्या रम्य पहाटे महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन,यवतमाळ येथे अद्भुत प्रतिसाद लाभला.
हितसंवर्धक मंडळाचेअध्यक्ष डॉ.अशोकराव मेनकुदळे,राज्य उत्पादन शुल्क,अमरावतीचे माजी अधिक्षक श्री राजेश कावळे,डॉ.जयेश हातगांवकर,बसव क्लबचे कार्याध्यक्ष श्री.विनोद नारिंगे, माजी.अध्यक्ष चंद्रशेखर उमरे,कल्पनाताई देशमुख ईत्यादी.मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलन झाले,यानंतर पाडवा पहाट ह्या भक्तीमय कार्यक्रमाला सुरवात झाली,ह्यामध्ये तु बुध्दी दे विश्वास दे हे सौ.सारिका उमरे ह्यांनी सादर केलेल्या ह्या प्रार्थनेने लिंगायत पाडवा पहाट या संगितमय कार्यक्रमाची सुरुवात झाली. तुझ मागतो मी आता, देहाची तिजोरी, ज्ञानियाचा राजा,सुंदर ध्यान ते,कानडाहो विठ्ठलु,ब्रम्हा विष्णु आणि महेश,देव देवाऱ्हात नाही,गजानना गजानना,ह्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वरचेवर चढत गेली सुर निरागस हो हे अद्वितीय गाणे गाऊन वेंदात उमरे ह्यांनी पाडवा पहाट ह्या कार्यक्रमाला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले,ह्यानंतर लिंगायत गाण कोकिळा वंदना बोनकीले हिने बोलावा विठ्ठल,पाहवा विठ्ठल हे गाण गााऊन वातावरण विठुमय करून टाकले, संपुर्ण कार्यक्रमामध्ये पारंपारिक पोषाख परिधान करून आलेल्या जान्हवी मनिष शेटे,व नभा प्रदिप उमरे ह्या चिमुकल्या लक्ष वेधुन घेत होत्या.तसेच आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, सक्षम अंदुरकर, श्रीराम जयराम मधुरा मेनकुदळे,कानडा राजा पंढरीचा वीर केळकर, ह्या चिमुकल्यांच्या गाण्याने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.संगिता शेटे,चिरायु हातगांवकर,उज्वला नारिंगे,स्नेहल महाजन,उषा कोचे,शिल्पा बेगडे,अमर केळकर,स्मिता गाढवे,नरेन्द्र मेनकुदळे, ईत्यादी गायकांनी एक एक सरस असे गाणी गायले, या बहारदार अशा लिंगायत पाडवा पहाट ला शेवटपर्यंत श्रोत्यांची गर्दी कायम होती. तेजश्री मानेकर ह्यांनी गायलेल्या भैरवीने पाडवा पहाट कार्यक्रमाची सांगता झाली.यादरम्यान .या बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शिल्पा बेगडे तर आभार प्रदर्शन श्री. निलेश शेटे यांनी केले. या कार्यक्रमाला वाद्यवृंदावर सुंदर अशी साथ सतीश वाढई आणि , त्यांच्या चमुने दिली़, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता बसव क्लब,वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान तसेच विनोद नारिंगे,अनिल बेगडे संजय कोचे, चिरायु हातंगावकर गिरीष गाढवे, डॉ. किशोर मांडगांवकर, मंगेश शेटे, बाळासाहेब दिवे सुरेश शेटे, निर्मल ठोबंरे,नागेश कुल्ली,अमर केळकर,नागेश कुल्ली,प्रदिप उमरे,डॉ. मंगेश हातगांवकर, डॉ. राजेश उमरे,संजय तोडकरी प्रा.राजेश मानेकर,सारंग गाढवे, रमेश केळकर,राजु मेनकुदळे,आशिष रेवडी,उमरे ,अशोक तेले,अशोक जिवरकर ईत्यादींचे सहकार्य लाभले.