राहत फॅमेली कान्सलींग सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न

राहत फॅमेली कान्सलींग सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न

प्रतिनिधी उमरखेड -सध्याच्या काळात सामाजिक परिस्थीती फार बदलली असून घरा, कुटुंब, परिवारात अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन आपसी कलहाच्या घटनेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे . पती – पत्नी चे संबंध पण कमकुवत झाले असून त्यांचे मध्ये हिंसा-घटस्फोटाचे प्रमाणपण वाढले आहेत .समाजातील वाढत्या अशा घटनांवर आळा बसावा . नात्यामध्ये प्रेम -द या- करुणा विकसित होऊन आर्दश घर आदर्श परिवार व आर्दश समाजाची निर्मिती व्हावी . तसेच नातेसंबंधात कलह निर्माण करणाऱ्या संभाव्य घटनावर उपाय म्हणून विवाहपूर्व व विवाह पश्च्यात काँन्सीलींग व्हावी या उदात्त उद्देशाने राहत फॅमेली कॉन्सीलिंग सेंटरची स्थापना जमाअत ए इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेतर्फे 26 जानेवारी प्रजासत्तांक दिनानिमित्त करण्यात आली .

स्थानिक तातारशहां वार्ड येथे सकाळी अकरा वाजता मौ . मो .ईलीयास खान फलाही, सदस्य मुस्लीम लॉ बोर्ड तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र यांचे शुभहस्ते राहत फॅमेली काँन्सीलींग सेंटर चा उद्घघाटन सोहळा संपन्न झाला .

याप्रसंगी मंचावर नईम शेख जिल्हा संघटक यवतमाळ, हाफीज अनिस, अलीयार खान जनाब ,अँड. यासीर खान , काझी जहीरोद्दीन उपस्थीत होते .

उमरखेड राहत फेमिली कॉन्सीलिंग सेंटर काझी जहीरोद्दीन, शेख महमुद जनाव, मौ. अ .रउफ नदवी, अँड .सलीम सौदागर, कासीम अली,आसिफ अन्सारी, अफरोज सुलताना हे कॉंन्सीलर असून या सेंटरमध्ये मोबाईल ग्रस्त , महाविद्यालयीन मुले -मुली, वारसा हक्काचे तंटे, आपसी लहान मोठे भांडण -तंटे, इत्यादी विषयावर काँन्सीलिंगचे कार्य करण्यात येईल .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख नईम यांनी, सुत्रसंचलन अ .रउफ नदवी यांनी तर आभार प्रदर्शन काझी जहीरोद्दीन यांनी केले .

इनायतउल्ला जनाब, हाफीज मंसुरखान,कारी मो . अली, रसुल पटेल,अॅड वसीम, सै . युसुफ सर, रिफत अन्सारी,अ रऊफ टेलर, युसुफ सौदागर, मुर्तुजाअली, डॉ . शोएब, अ .रहेमान, सिद्दीक मंसुरी, मसुदमौलाना, शकील अहेमद क्लबी, कलीम उल्ला खान, जुनेद सालेह सर, इस्माईल शेख, हाफीज आदील, हाफीजमुसैब, जलील मौलाना, अहेमद -अमजद मौलाना समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यात उपस्थिती दर्शविली .

Updated : 27 Jan 2022 5:51 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.