राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेची शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारणी गठीत

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेची शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारणी गठीत

यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची बैठक पार पडली यावेळी विदर्भ अध्यक्ष पद्ममाकर घायवान, प्रफुल्ल मेश्राम, रवि चरडे, संतोष डोंमाळे यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्याची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी रामदास कांबळे, जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण मुक्कावार, जिल्हा संघटक पदी सय्यद मुजीबोद्दीन, जिल्हा सचिव पदी अब्दुल रफिक, जिल्हा उपाध्यक्षपदी राजू सोनुने, संपर्क प्रमुख पदी प्रकाश वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख पदी कुणाल आठवले, यांची निवडकरण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवड प्रक्रिया सर्वानुमते पार पडली संघटना सर्वांनी मिळवून मजबूत करावी अशी प्रतिक्रिया यावेळी विदर्भ अध्यक्ष पद्माकर घायवान यांनी सांगितली. या बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 25 Jan 2022 9:47 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.