राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमृतजल योजनेच्या विरोधात महानगरपालिकेमध्ये चिखलफेक आंदोलन करण्यात आले


गेल्या काही वर्षापासून अमृतजल योजनेच्या कामात कामाचे काम संथ गतीने सुरू आहेत आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे .अमृत जल योजनेचे पाणी अजून पर्यंत जनतेला पाणी मिळाले नाही या विषयाला घेऊन आज चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमृतजल योजनेचे पाणी जनतेला मिळत नाही या करीता आज महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर शहराचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ,नितीन भाऊ भटारकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे यांच्या नेतृत्वात चिखलफेक आंदोलन करण्यात आले.

आणि महानगरपालिकेला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला की येणाऱ्या १५ ते २० दिवसात अमृत जल योजनेचे पाणी चंद्रपूर शहर मधील जनतेला मिळाले नाही तर यापेक्षाही मोठ्या आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आंदोलन करते वेळी देण्यात आला. सदर आंदोलन करते वेळी ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे ,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, उपाध्यक्ष विनोद लभाने, जिल्हाध्यक्ष डी.के अरीकर साहेब, उपाध्यक्ष नासिर शेख ,कुमार पाल ,महासचिव संभाजी खेवले,ओबीसी अध्यक्ष विपिन झाडे, नौशाद सिद्दिकी,केतन जोरगेवार महासचिव युवक, शशिकांत भाऊ देशकर, निमेश मानकर , राहुल देवतळे शहर उपाध्यक्ष,युवक शहर उपाध्यक्ष सतीश मांडवकर ,अमित गावंडे , अक्षय सुखदेव, आकाश निरठवर, मनोज गेडाम,चेतन अनंतवार पंकज मुंडे, वीपील लाभणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.