राष्ट्रवादी जातीयवादीच!

—————————————————
लेखक श्री.तानाजी सखाराम कांबळे
रविवार विशेष!
दिनांक 3 एप्रिल दोन हजार बावीस
—————————————————
[“राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला.त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय”.]
[राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत
खंजीर खुपूसन: अनंत गीते
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रायगडमध्ये केले होते.]
[“यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील
हे सुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते.
पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.त्यानंतर ‘पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली होती”.]
राज्यसभेचे माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरद पवार,भारतीय राजकारणातील महाराष्ट्रातून,मुस्तदी,चतुर,राजकारणी म्हणून ओळखले जातात.श्री.पवार यांच्या बाबतीत ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे बोलत नाही ते मात्र ते नक्की करून दाखवतात अशा पद्धतीची राजकीय टिपणी
श्री.पवार यांच्या बाबतीत विश्लेषकांचे कडून केली जाते.
जातीपातीच्या राजकारणाचे मुळे महाराष्ट्रात घट्ट पेरून ठेवण्याचे काम श्री.पवार यांनी केल्याबाबत त्यांच्यावर ती वारंवार आरोप झाला आहे.श्री पवार यांनी महाराष्ट्रातून “बौद्ध” वगळता विविध जाती धर्मातील पुढारी मंडळी यांचे राजकीय घराणेशाही सांभाळण्याचे खूप मोठे योगदान दिले आहे.पवारांच्या पूर्वी आणि पवारांच्या नंतर,काँग्रेस पक्षाने1885 पासून ते 2022 पर्यंत,विविध जाती-पातीचे पुढारी घराणेशाहीच्या रुपाने सांभाळण्याचे भरीव योगदान दिले आहे.काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले
श्री.पवार यांनी,नेमका तोच कित्ता वयाच्या ऐंशीव्या वर्षी पर्यंत,आपल्या राजकीय जीवनात गिरवण्याचा प्रयत्न केला आहे.कोल्हापूरचे हसन मुश्रीफ,नबाब मलिक,
प्रा.लक्ष्मण ढोबळे,छगन भुजबळ,सुनील तटकरे,
धनंजय मुंडे,मधुकरराव पिचड,रामदास आठवले,
विजय कांबळे आदीसह विविध जाती धर्मातील नेत्यांना,श्री.पवार यांनी बळ देण्याचे काम केले.
काहीना श्री.पवार यांनी शेवटपर्यंत पाठबळ दिले तर काहींचे पाठबळ अर्धवट काढून घेऊन त्या ठिकाणी पर्यायी नेतृत्वाला वाव देऊन राजकारणातील शह-काट शहाचा डाव चपलाखीने श्री.पवार यांनी खेळला आहे.
यामध्ये सहकार,साखर सम्राट असणाऱ्या 96कुळी पाटीलकिस व त्यांच्या घराणेशाहीस तीन पिढ्या पर्यंत पोसण्याचे व सांभाळण्याचे काम तहायात श्री.पवार यांनी केली आहे.मराठा आरक्षणाला पडद्या पाठीमागून खतपाणी घालत,दलित-सवर्ण,ओबीसी सवर्ण यांच्यामध्ये तणाव निर्माण करण्याचे काम,पडद्या पाठीमागून श्री.पवार यांनीच केल्याचा आरोप त्यांच्यावर ती अनेक वेळा झाला आहे.वेळोवेळी फडणवीसांची जात काढणारे,श्री.पवार यांनी,शेतकऱ्यांचे नेते श्री.राजू शेट्टी यांची जात कोणती?असा देखील सवाल केला होता.
तर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना राज्यसभेवर ती राष्ट्रपती नियुक्त,खासदार केल्यावरती,इतिहासामध्ये डोकावताना छत्रपती पेशव्यांची,नियुक्ती करत असे!मात्र बदलत्या काळाच्या ओघात,पेशवेच छत्रपतींची नियुक्ती करू लागत असल्याची,बोचरी टिका कोल्हापूर येथील एका, कार्यक्रमांमध्ये,2014 ते 19 च्या दरम्यान चे काळातील तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेताश्री.फडणवीस यांचे वरती श्री.पवार यांनी केली होती.
मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव अनेक वर्षे श्री.पवार यांच्या नेहमीच्या प्रश्न भिजत घोंगडे ठेवण्याचे सवयीमुळे,
त्यावेळी संघर्षमय झाला होता.1992 च्या हिंदू-मुस्लिम दंगली मध्ये एकूणच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भूमिका संशयास्पद राहिली असल्याची,चर्चा आज देखील राजकीय विश्लेषकांचे कडून व्यक्त केली जाते.
वरील अनेक विषयाशी संबंधित श्री.पवार हे केवळ जातीपातीच्या राजकारणाला चिकटून राहिल्याने
आतून बळ दिल्याने नेहमीच वादातीत राहिले आहेत.
याचाच धागा गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यामध्ये,महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख श्री.राज ठाकरे यांनी पकडत,श्री पवार यांना जातीय वादाच्या पिंजऱ्यात अडकण्याचे काम केले.
श्री.ठाकरे नेमके काय म्हणाले ते आपण पाहूया.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शनिवारी शिवतीर्थावर पार पडला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ धडाडल्याचं दोन वर्षांनंतर पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला करत थेट आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय.जातीवादाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला गेला’, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलाय.
जातीवादावरुन शरद पवारांवर थेट हल्ला
राज ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वावर बोलणार. माझ्या दृष्टीकोनातून हिंदुत्व काय हे मांडणार आहे. आयोध्येला जाणार की नाही तर जाणार. आता तारीख सांगत नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदू आणि मुसलमान असतो. 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला तो भारतीय असतो. चीनने आक्रमण केलं तर कळत नाही आपण कोण आहोत. मग जेव्हा हिंदू ना भारतीय असतो तेव्हा तो होतो मराठी, तमिळ, बंगाली, गुजराती पंजाबी. मग त्यावेळी आपण मराठी होतो. मराठी झाल्यानंतर मग तो होतो मराठा, तो होतो माळी, तो होतो ब्राह्मण , आगरी. काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. काही लोकं कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे. शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. 1999ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला. फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं अमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. इतिहास वाचायचा नाही. लिहिलंय कुणी, पुरंदरे ब्राह्मण. अच्छा अच्छा.. म्हणजे त्याने काही तरी चुकीचं लिहिलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवरायाने स्वराज्यासाठी एक व्हा सांगितलं. तिथे जातीपातीवरून वाद सुरू आहे. राजकारण सुरू आहे.जातीतून बाहेर नाही पडणार तर हिंदू कधी होणार? असा सवालही राज यांनी यावेळी विचारला.
श्री.शरद पवार यांच्या विषयी
———————————————————
शरद गोविंदराव पवार .
मुक्काम पोस्ट काटेवाडी,तालुका बारामती,
जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र.
हे मराठी,भारतीय राजकारणी आहेत.
इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
कार्यकाळ इ.स. १९७८-८०, इ.स. १९८८-९१
व इ.स. १९९३ – इ.स. १९९५.
जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४०
बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पत्नी प्रतिभा पवार,अपत्ये सुप्रिया सुळे
वैयक्तिक जीवन
पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच् काळ सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत.
राजकारण
इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
इ.स. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.
विधानसभा
सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते.
पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर ‘पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली.
मुख्यमंत्री
१८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
लोकसभा
इ.स. १९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च इ.स. १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
परत विधानसभा
इ.स. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.स. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
नोव्हेंबर इ.स. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी इ.स. १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च इ.स. १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.
जानेवारी इ.स. १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.
इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
पुनः दिल्ली
नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून इ.स. १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च इ.स. १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.
विधानसभा,चौथी खेळी
पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च इ.स. १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत २५७ लोक ठार तर ६००हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर इ.स. १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने मोर्चेकऱ्यांची भेट न घेता त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यात चेंगराचेंगरी होऊन ११४ लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांना तेव्हा या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला.
राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुला लढवल्या.
जनतेत सरकारविरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला.
दिल्लीची तिसरी फेरी
इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. जून इ.स. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला.
इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
१२वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. १९९९मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, ‘१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,’उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे’ या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.
राष्ट्रवादी
त्यानंतर १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली. इ. स्. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता.
क्रिकेट
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
शिक्षणसंस्थांमधील सहभाग
पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे –
विद्या प्रतिष्ठान, बारामती
कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती
रयत शिक्षण संस्था, सातारा
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे
शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव, बारामती
—————————————